इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 परप्रांतीय तरुणीवर तिघांचा बलात्कार

परळी वैद्यनाथ, प्रतिनिधी..

         काम देण्याचे आमिष दाखवून एका तृतीयपंथीयाने परप्रांतीय २० वर्षीय तरुणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केले आणि तिघांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना  परळी तालुक्यातील अस्वलआंबा शिवारात शनिवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी तृतीयपंथीयासह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनेतील पीडिता मूळची हैदराबाद येथील असून,मुंबईत घरगुती साफसफाईच्या कामावर होती. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती मुंबईहून हैदराबादला जाण्यासाठी रेल्वेने निघाली होती. भूक लागल्याने ती परळीत उतरून एका हॉटेलमध्ये जेवत असताना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची नजर तिच्यावर पडली. पूजाने बोलत बोलत तिची गरज जाणून घेतली आणि काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे (रा. डाबी, ता. परळी) आणि मोहसीन सरदार पठाण (रा. शिवाजीनगर, परळी) या दोघा साथीदारांना बोलावून घेतले.

त्यानंतर ते तिघे पीडितेला मोटारसायकलवर बसवून अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या  साथीदाराकडे घेऊन गेले. तिथे एका मंदिराशेजारी असलेल्या भागवत कांदे याच्या मालकीच्या खोलीमध्ये नेऊन जिवे मारण्याची धमकी देत मारहाण करीत तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

याकामी पूजाने त्यांना मदत केली. सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या