विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

 आज संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - विकास वाघमारे

प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस,  सहाय्यक आयुक्त मा. विशालजी लोंढे,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची उपस्थिती लाभणार

परळी (प्रतिनिधी) - संत परंपरेतील समाजप्रबोधनाची अखंड ज्योत असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, परळी यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम आज सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. परळी परिसरातील सर्व अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रेरणादायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार विकास वाघमारे यांनी केले आहे


या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संयोजक तथा संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे यांनी केले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (२०१६) चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून समाज कल्याण विभाग, पुणे येथील सहाय्यक आयुक्त मा. विशालजी लोंढे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून देवाची आळंदी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्यात “फुले, शाहू, आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यातील संवादी समता आणि परिवर्तनवादी विचार” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांतील समान धागे, सामाजिक समता, शिक्षण, स्वच्छता व परिवर्तनाची दिशा यावर सखोल चिंतन करण्यात येणार आहे.

याच वेळी प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, सामाजिक कार्यात अग्रक्रमी योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सांगता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या समाजप्रबोधनपर कीर्तनाने होणार असून, कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीचा संदेश दिला जाणार आहे.

मानवतावादी विचारधारेचे परळी परिसरातील सर्व अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रेरणादायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे , पत्रकार विकास वाघमारे, सुशिल पोटभरे, रोहित झिंजुर्डे, राहुल सूर्यवंशी , विशाल डोंबे , महेश मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या