विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

सनराईज स्कूलची शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचाल गौरवास्पद : नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी



उत्तुंग भरारी घेण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या पंखांना बळ द्यावे-  अभिनेत्री प्रेरणा खरात

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

     परिवर्तन युवा मंच संचलित, सनराईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, परळी-वैजनाथ यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्याने परळीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना परळी नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी म्हणाल्या की, सनराईज स्कूलची शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचाल अत्यंत गौरवास्पद आहे. परळी शहराच्या नावलौकिकात भर घालणारे उत्तम विद्यार्थी या संस्थेतून घडतील असा मला विश्वास आहे.असे सांगून शाळेचे कौतुक केले.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरलेल्या मिस इंडिया स्माईल अवॉर्ड विनर, मॉडेल व अभिनेत्री प्रेरणा खरात यांनी आपल्या भाषणात उत्तुंग भरारी घेण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या पंखांना बळ देऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन करत सनराईजचे स्नेहसंमेलन म्हणजे केवळ कार्यक्रम नसून तो उत्साह, कला आणि संस्कृतीचा एक सुंदर संगम आहे, असे प्रतिपादन  केले.

मंचावर  नगरअध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी ,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे,अभिनेत्री व मॉडेल प्रेरणा खरात,सिने-नाट्य अभिनेता, लेखक व दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे ,पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे,भगवान सेनेचे प्रदेश अध्यक्ष माणिकभाऊ फड, नगर परिषद बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे,परळी शहर पोलीस स्टेशनचे  एपीआय नितीन  गट्टूवार,तलाठी श्यामसुंदर गित्ते,संस्थेचे अध्यक्ष गोविंदरावजी मुंडे ,सचिव सौ. प्रियतमा मुंडे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र चाटे,उद्धव कराड ,फुलचंद मुंडे,प्राचार्य  प्रदीप खताळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती

या सोहळ्यात  विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते आणि बॉलिवूडमधील गाण्यांवर एकापेक्षा एक सरस नृत्याविष्कार करत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . विद्यार्थ्यांच्या या दर्जेदार सादरीकरणाने उपस्थित पालकांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले, तर सूत्रसंचालन रुईकर मॅडम यांनी प्रभावीपणे निभावले. शेवटी संस्थेच्या सचिव सौ. प्रियतमा मुंडे यांनी अनोख्या शैलीत कृतज्ञतापूर्वक  सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या