विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

परळीच्या अक्षय मुंडे चा सहभाग

 पर्यावरण, जैविक संवर्धनासाठी भारतभ्रमण: अवलिया दोन युवकांचे परळीत स्वागत


परळी / प्रतिनिधी

      विकासाच्या नावाखाली होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास पर्यायी जैविक विविधतेचे नुकसान याची जनजागृती करत पर्यावरण संवर्धन आणि जैव विविधता टिकविण्यासाठी देशभरात असलेल्या 58 व्याघ्र प्रकल्पला भेट देणाऱ्या युवकांचा परळी येथील नागनाथ निवासी विद्यालयाच्यावतीने सत्कार व सन्मान करण्यात आला.

         विकासाच्या नावाखाली आजमितीस मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे.जल, जंगल, जमीन, नदी यांचे अस्तित्व नष्ट होत असल्याने पर्यायी यावर अवलंबून असलेली जैव विविधता नष्ट होत चालली आहे. पर्यावरणातील अन्न साखळी बिघडत जात असल्याने सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होत असल्याने परळी येथील आयोध्या नगर मधील रहिवासी असलेला युवक अक्षय मुंडे व त्याचा मित्र नागपूर येथील आशिष यादव यांनी पर्यावरण संवर्धन आणि जैव विविधता जतन आणि संवर्धन उपक्रम हाती देशभरात  58 व्याघ्र प्रकल्पाला पाच महिन्यात टूव्हीलर वर 23 हजार किलोमीटर  सफारी माध्यमातून  जनजागृती करत आहेत. या अवलिया युवकांनी याचकामासाठी  या अगोदर दक्षिण आफ्रिका या देशाचा अभ्यास दौरा पण केला आहे  अक्षय मुंडे हा परळी येथील नागनाथ निवासी विद्यालयाचे सहशिक्षक ज्ञानोबा मुंडे यांचा मुलगा असून त्याच्या या सफारी दरम्यान परळी येथे आले असता विद्यालयाच्या वतीने अक्षयची आई मिराबाई मुंडे, व शिक्षक सहकारी मित्र यांचा विद्यालयाच्या वतीने हृदपूर्वक सत्कार व सन्मान करून या कार्याची गिनीस बुकात नोंद व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली वपुढील प्रवासच्य वाटचालीस  प्रेरणा देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या