अभिष्टचिंतन.....

 ईटके गुरूजी म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व-विलास ताटे





परळी वै....... -

ईटके गुरूजी म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन ओबीसी परिषदेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विलास ताटे यांनी केले आहे.

दि.3 मार्च 2026 रोजी 80 वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. गुरूजी वैद्यनाथ विद्यालयात शिक्षक असतांना पूर्णतः चांगला विद्याथ घडवण्यामध्ये त्यांचा हातखंडा असायचा फक्त विद्यार्थ्यांना शिकवणे हा उद्देश न ठेवता त्याच्या सुख-दुःखाची जाणीव ठेवून त्या विद्यार्थ्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यामध्ये त्यांचा रस असायचा. राजकारणात राहूनही कसल्याही प्रकारच्या आमिषाला न बळी पडता कोणत्याही वाईट सवयीला जवळ न येवू देता दुसऱ्यांचे चांगले व्हावे यासाठीच अहोरात्र प्रयत्न करित असत. एखाद्या व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तिबद्दल तो व्यक्ति वाईट आहे असे सांगितल्यास ते कधीही त्या व्यक्तिस नाव ठेवण्याचे काम करित नसत आजही व्यायामाला प्रथम प्राधान्य देवून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टिने सर्वांना विनाशुल्क कसल्याही प्रकारच्या आमिषाची अपेक्षा न करता ते मार्गदर्शन करतात. म्हणुनच त्यांना सर्व राजकीय पक्षातील, सर्व क्षेत्रातील नागरिक मान देतात हे एक त्यांच्यातील वैशिष्टय आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्या वाढदिवसानिमित्त विलासराव ताटे, रमाकांतअप्पा निर्मळे, वैजनाथअप्पा कोल्हे, हरिभाऊ मोदाणी, सुनिल फुलारी, प्रभूअप्पा ईटके यांनी त्यांचे आशिर्वाद घेवून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व गुरूदक्षिणा म्हणुन फळे दिली. त्यावेळी गुरूजींनी सर्वांना मनःपूर्वक आर्शिवाद दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...