सर्व स्तरातून अभिनंदन....
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले - प्रा. डॉ. माधव रोडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आत्माराम कराड यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न!
परळी - वै : प्रतिनिधी...
माळहिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला . जयंती निमित्ताने निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन सरपंच आत्मरामजी कराड, प्रा. डॉ. माधव रोडे प्रा. विजयजी मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ॲड . सुनिल सोनपीर , उपसरपंच, जयंती समिती अध्यक्ष , पोलीस पाटील कृष्णा धनघाव आदि होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. माधव रोडे म्हणाले , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. शिक्षण हेच प्रगतीचे मुख्य साधन आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा सन्मान कायम ठेवा, व्यसनांपासून दुर रहा. सहकार्याची भावना ठेवा, संयमी व्हा , हार मानू नका , आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छा शक्ती व मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते. आपली जगण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत मग शिका ! जिद्दी ठेवा ! संघर्षांची तयारी सह संयम ठेवा असे प्रा. माधव रोडे यांनी आपले मत मांडले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.विजय मुंडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी भारतीय संविधानतून प्रत्येक नागरिकांना समान अधिकार दिले. भारतीय संविधानानेच राष्ट्रीय एकात्मा टिकून आहे. संविधान म्हणजे तुमचा माझा सर्व भारतीयांचा जगण्यातला श्वास आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर ॲड . सुनिल सोनपिर यांनी बुद्ध धम्म आणि बाबासाहेब यांचावर धम्मा प्रभाव धम्म मुल्यांवर प्रकार टाकला .
यावेळी उपस्थित विश्वंभर धायगुडे वाल्मीक सलगर रावसाहेब शिंदे प्रभाकर डिगोळे अंगद शिंदे अविनाश फड राम वावळे शिवाजी साळवे पिंटू डिगोळे रंजीत वलेकर जयंती कमिटीचे दादाराव वावळे भगवान साळवे दीपक बडसिंग वैभव पोटभरे धीरज वावळे अमर वावळे रणजीत वावळे, मनोहर व्हावळे, भानुदास व्हावळे प्रतीक साळवे बाबा वावळे पवन साळवे धम्मानंद वावळे मुंजा हरी वाबळेआधी सह महिला पुरुष उपासक उपासिका उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा