सर्व स्तरातून अभिनंदन....

इमेज
'मृद विज्ञान' आणि 'मशिन लर्निंग'चा संगम; परळी तालुक्यातील मांडव्याच्या सुपुत्राला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान परळी वैजनाथ, प्रतिनिधी:       आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधणे काळाची गरज बनली आहे. याच विचारातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गिरीश दशरथ चाटे यांना त्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रबंधाबद्दल 'डॉक्टरेट' (पीएचडी) पदवी प्रदान केली आहे.        गिरीश चाटे यांनी "A Novel Framework for Soil image Classification Using Machine Learning" या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या संशोधनात मृद विज्ञान (Soil Science) आणि मशिन लर्निंग (Machine Learning) या दोन भिन्न क्षेत्रांची सांगड घालत मातीच्या वर्गीकरणासाठी एक नवीन 'फ्रेमवर्क' विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे मातीचे अचूक आणि जलद वर्गीकरण करणे शक्य होणार असून, याचा मोठा फायदा कृषी क्षेत्राला होऊ शकतो. विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विभागाचे  डॉ. संदीप एस. भामरे यांचे त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मो...

परळी येथे सत्कार.....

 मनातली इच्छा जिद्द आणि चिकाटीने मिळवता येते -उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी




परली वैजनाथ - मनातली इच्छा जिद्द आणि चिकाटीने मिळवता येते असे प्रतिपादन नुकतेच लातुर येथे नवनियुक्त उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी यांनी परळी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात केले. 

सतत प्रयत्न जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर हे यश साध्य केले आहे. या कार्यक्रमासाठी परळी फुलारी मित्र मंडळाच्या वतीने नियोजन माधवबाग येथे करण्यात आले होते कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक माजी सैनिक अरविंद गणपतराव फुलारी, प्रमुख  पाहुणे परळी तालुका ओबीसीचे अध्यक्ष विलासजी ताटे, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. यल्लावाड, अखिल भारतीय फुलारी समाज चे अध्यक्ष सुधीर फुलारी व सत्कारमूत उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी यांचे उपस्थिती होती. कार्यक्रमात परळीतील फुलारी परिवारातील सर्वांनी उपस्थिती लावली तसेच परिवाराचे स्नेही मित्र मंडळातील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभासदांची व इतर शिक्षक मित्रमंडळींनी या सत्कारासाठी आवर्जून उपस्थिती लावली होती. मनोगतामध्ये अनंत मुंडे सर प्राचार्य अरुण पवार सर यांनी फुलारी परिवारा प्रति असलेले कौटुंबिक संबंध विस वर्षाच्या प्रयत्नाचा ओहापोह केला. प्रसंगानुरूप कविता सादर केली शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागभूषण फुलारी यांनी केले. प्रस्ताविकातून त्यांनी चांगले विचार, फुलारी समाज, विद्याथ, शिक्षकांना असलेले मार्गदर्शन व सल्ला अत्यंत महत्त्वाचे आहे असे आवर्जून  वर्णन केले.समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ मानाचा फेटा व 50 किलो फुलांच्या हाराने  उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी नंदकुमार खानापूरे,लाहोटी सर, संभाजी फुलारी सर,म.सा.प.सदस्य प्रा. संजय आघाव, बंडू आघाव सर, इंगोले सर, यांनी फुलारी सर यांचा सत्कार केला. व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती ओबिसी नेते ताटेजी यांनी शिक्षण संचालक व्हावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. उस्मानाबाद जिल्ह्यात विस्तार अधिकारीचा तब्बल पंधरा वर्षाच्या कार्यकाळातून विविध परीक्षा देऊन  एमपीएससी मार्फत 2017 पासून या पदासाठी प्रयत्नशील होते. लातूर येथे त्यांची नियुक्ती  पदोन्नतीतून झालेली आहे. सत्काराला उत्तर देताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचला आणि त्यांना करावे लागलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा ऐकून सर्व स्तब्ध झाले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद फुलारी यांनी  मार्गदर्शन करून कर्म आणि फळ याविषयीचे त्यांच्या जीवनातील अनुभवावरून मनोगत कथन केले यथायोग्य  वेळी जे प्राप्त होते त्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे असे मनोगत मांडले. या वेळी स्नेही मित्र मंडळच्या वतिने विशेष सत्कार, अभिनंदन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बालाजी कांबळे सर यांनी करून प्रेक्षकांची मने जिंकली. तर आभार प्रदर्शन छायाचित्रकार सुनील फुलारी यांनी खुमासदार शैलीमध्ये केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....