पहिल्या बॅचच्या प्रशिक्षणाचा समारोप...

 जनगणना-२०२७ : १ मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेत नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी



परळी वैजनाथ: प्रतिनिधी

    देशाच्या नियोजनाचा मुख्य आधार असलेली 'जनगणना-२०२७'  सुरू होत आहे.१ मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेत नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.

     जनगणना- २०२७ च्या अनुषंगाने परळी वैजनाथ येथे तीन दिवसाचे पहिल्या बॅचचे प्रशिक्षण डॉ. भालचंद्र वाचनालय या ठिकाणी घेण्यात आले. जनगणना प्रगणक, व पर्यवेक्षकांच्या या प्रशिक्षणाचा समारोप झाला. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रशिक्षणार्थी प्रगनक व पर्यवेक्षकांशी संवाद साधत त्यांनी जनगणना २०२७ मध्ये नागरिकांनी उस्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.यावेळी नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी संतोष रोडे यांच्यासह या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक व जनगणना प्रगनक, पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले की, जनगणना-२०२७'प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून नागरिकांना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी 'स्व-गणना' हा विशेष पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जनगणनेचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 'मकान सूचीकरण आणि घरांची गणना' ही प्रक्रिया १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत होणारी ही १६ वी जनगणना असून, नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...