महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....

इमेज
पारदर्शक कारभाराचे आणखी एक पाऊल: परळी नगर परिषदेचे ठराव आता  एका क्लिकवर सभेचा इतिवृतांत ऑनलाईन टाकणारी परळी वैजनाथ नगर परिषद ठरली पहिली महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी....    परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा यु एल बी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. यापूर्वी नगर परिषदेचे ठराव पाहण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ही सर्व माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर इतिवृत्त प्रकाशित करणारी परळी वैजनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.         राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ...

नागापूरची डॉ. आंबेडकर जयंती म्हणजे सम्यक समता - प्रा. डॉ. माधव रोडे



परळी - वै : येथील नागापुर गावाचे समतेचे प्रतीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अर्थात संविधान स्तंभ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण प्रमुख वक्ते प्रा. डॉ. माधव रोडे यांचा शुभ हस्ते सपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष : नागापुर गावच्या सरपंच सौ . मंगल रमेश तोंडारे , उपसरपंच  संतोष सोळंके होते. यावेळी प्रमुख उपस्थिति  वंचित बहुजन धाडीचे जिल्हा महासचिव  मिलिंद घाडगे , ॲड . सुरज घाडगे , शाम गंगाधरे , माजी सरपंच मोहनदादा सोळंके,  ॲड . अर्जन सोळंके ,शाम गंगाधरे , शिवाजी सोळंके , पशुवैद्यकीय अधिकारी श्री कृष्णा कोळी अदि होते. 

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. माधव रोडे म्हणाले नागापूर गावाची म्हणजे सम्यक स्वयंम्भू जयंती सोहळा आहे अस मला वाटते  कारण फक्त सामाज बांधवाच्या दानातून केला जाणार हा.जयंतीचा उपक्रम  स्वयंमभू आहे. हे पाहुन मला आनंद  झाला . नागापुर गावातील सर्व गावकऱ्यांचा तरुण युवा तसेच सम्यक मित्र मंडळ यांच्यातील एकत्मता हेच सांगते की, नागापूरची  डॉ. आंबेडकर जयंती म्हणजे सम्यक समता आणि गावातील सामाजिक सलोखा. ग्रामिण भागांमध्ये संघर्ष आणि वेदना भरीलेले असतानाही, बाबासाहेबांनी आपल्याला शिकवले की, वेदनांच्या वादळातूनही आपण एकत्र येऊन, एकमेकांच्या मदतीने आणि समतेनेच आपले जीवन सावरणे शक्य आहे. संदेश होता की, प्रत्येक घरात संघर्ष असला तरीही, मानसिकतेत एकतेने आणि सामंजस्यानेच आपण प्रगती करू शकतो.  आपले प्रत्येक घर घरातील प्रत्येक माणूस संघर्ष व दुःखाच्या वेदनातून मार्गक्रमण करत असला. तरी जगण्याची उर्जा उम्मीद उर्मी आपल्यात डॉ. आंबेडकरांचे विचार देतात ते विचार आपण आत्मसात करावे. सर्वसामान्य भारतीयांचा आत्मसन्मान हाच भारतीय संविधान आत्म आहे. हे लक्षात ठेवा असे प्रा. माधव रोडे म्हणाले. यावेळी मिलिंद घाडगे , ॲड . अर्जन सोळंके यांनी जयंतीच्या शुभेच्छापर भाषण केली . कार्यक्रमाचे प्रस्ताविक भागवत  मुंडे यांनी केले. आयोजन सम्यक मित्र मंडळ व समस्त गावकारी मंडळ , नागापूर कॅम्प यांनी केले. त्यात स्वागतोत्सुक जयंती समिती अध्यक्ष . अविनाश बनसोडे, उपाध्यक्ष राहुल बनसोडे , सचिव धम्मानंद बनसोडे , विजय  माणिक बनसोडे ग्राम पंचापत सदस्य अदिनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....