सर्व स्तरातून अभिनंदन....

इमेज
'मृद विज्ञान' आणि 'मशिन लर्निंग'चा संगम; परळी तालुक्यातील मांडव्याच्या सुपुत्राला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान परळी वैजनाथ, प्रतिनिधी:       आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधणे काळाची गरज बनली आहे. याच विचारातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गिरीश दशरथ चाटे यांना त्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रबंधाबद्दल 'डॉक्टरेट' (पीएचडी) पदवी प्रदान केली आहे.        गिरीश चाटे यांनी "A Novel Framework for Soil image Classification Using Machine Learning" या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या संशोधनात मृद विज्ञान (Soil Science) आणि मशिन लर्निंग (Machine Learning) या दोन भिन्न क्षेत्रांची सांगड घालत मातीच्या वर्गीकरणासाठी एक नवीन 'फ्रेमवर्क' विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे मातीचे अचूक आणि जलद वर्गीकरण करणे शक्य होणार असून, याचा मोठा फायदा कृषी क्षेत्राला होऊ शकतो. विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विभागाचे  डॉ. संदीप एस. भामरे यांचे त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मो...

न.प. ची अतिक्रमण हटाव मोहिम : कायमस्वरूपी पथकाची स्थापना

न.प. ची अतिक्रमण हटाव मोहिम : कायमस्वरूपी पथकाची स्थापना



अतिक्रमणे काढण्यात कोणताही भेदभाव होणार नाही ; सर्व नागरिकांना सारखाच न्याय - मुख्याधिकारी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

       परळी वैजनाथ शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरी सुविधांमधील अडथळे दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ राबवण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.,अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी कायमस्वरूपी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अतिक्रमणे काढण्यात भेदभाव होणार नाही. सर्व नागरिकांना सारखाच न्याय  दिला जाणार आहे. ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

        शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा आणि प्रामुख्याने नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी व स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेने भेदभाव न करता सरसकट कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत सातत्य राखण्यासाठी प्रशासनाने एक ‘कायमस्वरूपी अतिक्रमण निर्मूलन पथक’ स्थापन केले आहे. या पथकात नगर परिषदेचा अभियांत्रिकी विभाग, स्वच्छता विभाग आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मोहिमेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाचेही सहकार्य घेतले जात आहे. हे पथक केवळ सध्याची अतिक्रमणे काढणार नाही, तर भविष्यात नवीन अतिक्रमणे होणार नाहीत याचीही नियमित पाहणी करणार आहे.

स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन...

   नगर परिषद प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना आधीच पूर्वसूचना दिली असून, आपले अतिक्रमण स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन केले आहे. जे नागरिक सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर पालिकेच्या वतीने कारवाई केली जाईल आणि त्या कारवाईचा खर्चही संबंधित अतिक्रमणधारकाकडूनच वसूल केला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांनी आपल्या भागातील अतिक्रमणाबाबत काही तक्रारी किंवा सूचना असल्यास थेट नगर परिषदेच्या मुख्यालयी किंवा अतिक्रमण विभागाशी संपर्क साधावा. शहराच्या विकासासाठी परळीकरांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....