दोन आरोपींवर गुन्हा दाखल

 कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २ लाख ६५ हजारांच्या आठ गायींची पोलिसांकडून सुटका

माजलगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

माजलगाव, दि. २४ (प्रतिनिधी) : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या आठ गोवंशीय गायींची माजलगाव ग्रामीण पोलिसांनी सुटका करत दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील मनूर वस्ती भागात काही गायी कत्तलीच्या उद्देशाने आणून अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आल्याची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक मुदीराज व सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने छापा टाकला.

या कारवाईदरम्यान आरोपी अन्वर कुरेशी व सादेक जावेद यांनी आठ गोवंशीय गायी अंदाजे २ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या गायी कत्तलीच्या उद्देशाने आणून ठेवल्याचे उघड झाले. तसेच जनावरांना चारा-पाणी न देता उपाशी अवस्थेत बांधून ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले.

पोलिसांनी तत्काळ आठही गायी ताब्यात घेत त्यांची सुटका केली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरनं २३२/२०२६ अन्वये आरोपी अन्वर कुरेशी व सादेक जावेद यांच्याविरोधात प्राण्यांशी क्रूरतेने वागणूक प्रतिबंध अधिनियम कलम ११(१) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब), ६, ९, ११ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ११९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बळवंते हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार