विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?
गंगाखेड - परळी रस्त्यावर निळा फाट्याजवळ अपघात; ऑटोचालक युवक ठार
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
गंगाखेड ते परळी रस्त्यावरील निळा फाट्याजवळ असलेल्या जिनिंग नजीक ऑटोचा भीषण अपघात होऊन ऑटोचालक युवक ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात आज (दि.२३) रोजी सायंकाळी 6:45 च्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साळुंकवाडी ता. अंबाजोगाई येथील ऑटोचालक युवक परमेश्वर विठ्ठल कर्वे (वय 37) हे प्रवासी भाडे घेऊन गंगाखेडकडे गेले होते. गंगाखेडहुन परळी कडे परत येत असताना गंगाखेड -परळी रस्त्यावर निळा गावच्या फाट्यापासून काही अंतरावर या ऑटोची मोठ्या वाहनाला धडक झाली. या धडकेत ऑटो चे मोठे नुकसान झाले असून ऑटो चालक युवक परमेश्वर कर्वे गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी पडला होता. अपघात स्थळावरून परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात मृत्यू पावलेला ऑटो चालक युवक परमेश्वर कर्वे हा अतिशय सुस्वाभावी, मनमिळाऊ व सर्वपरिचित युवक होता. त्याच्या अपघाताची बातमी कळताच साळुंकवाडी व परळी परिसरातील त्याचे परिचित यांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मयत युवक परमेश्वर कर्वे हा घरचा कर्ता होता. त्याच्या पक्षात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घरच्या कर्त्या युवकाचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा