दुःखद वार्ता...
गणेश कदम यांचे यांचे निधन
अंबाजोगाई: येथील व्यावसायिक तथा नगरसेवक महेश कदम व अनंत कदम यांचे बंधू गणेश जगन्नाथराव कदम यांचे २९ मे २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. या धक्कादायक बातमीमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
गणेश कदम यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच ३० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता बोरूळ तलाव स्मशानभूमी, अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा