विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?
मेलोडीला गोडी देशभक्तीची, राहुल गांधीनं लावली वाट स्वदेशीची
चॉकलेटसाठी रस्त्यावर उतरून तमाशा...भारतीय उत्पादकांचा अपमान
2014 साली देशाची सुत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हाती घेतली अन् स्वदेशीचा गाजावाजा सुरू झाला. आत्मनिर्भर भारत कल्पनेचा जन्म त्यातुनच पुढे आला. करोनासारख्या भयंकर आजाराची लस देखील आत्मनिर्भर झाली. प्रत्येक भारतीयाला स्वदेशीचा स्वाभिमान असतोच पण केवळ राजकिय स्वार्थापोटी सत्ता बाहेर पडलेल्या काँग्रेस संस्कृतीला मात्र स्वदेशी कल्पना तर सोडा भारतीय उत्पादकांचा तिळाएवढा अभिमान वाटत नाही हे दुर्दैव. मेलोडी चॉकलेटची गोडी देशात चाळीस वर्षापासुनची चाखत आलो. तोच स्वाभिमान उराशी बाळगुन इटालीत दौर्यावर गेलेल्या मोदीजींनी त्या देशाच्या पंतप्रधान मेलोनीला मेलोडी भेट दिली. खरं तर भारतीय संस्कृती, रूढी, परंपरेचा तो भाग देखील आहे. एका भेटीनं तेवढ्या भेटवस्तूनं खरं तर चॉकलेटची गोडी आंतरराष्ट्रीय बाजारात जावुन पोहोचली. तिथेच भारतीय नागरिकांची कॉलर टाईट झाली. मात्र केवळ राजकिय स्वार्थापोटी सत्ताबाहेर खिचपत पडलेल्या काँग्रेसवाल्यांचं पित्त खवळलं. अगदी राहुल गांधीपासून लंग्या-सुंग्यांनी देखील उत्पादनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने चालु केली. भारतीय उत्पादनांची टिंगलटवाळी करणं, रस्त्यावर उतरून तमाशा करणं अन् त्या गोडीला राजकारणाच्या डबक्यात ओढणं याचाच अर्थ काँग्रेसवाल्यांनी भारतीय उत्पादकांचा मोठा अपमान केला असुन देशातील लघुउद्योगासह बड्या उद्योगाची थेट राहुल गांधी यांनी नाक घासुन माफी मागायला हवी.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर आपले पंतप्रधान परदेश दौर्यात विविध देशांना भेटत आहेत. खरं तर त्यांचा दौरा व्यापार संबंध वाढवणे, कंपन्या करार करणे, एवढेच नव्हे इंधन पुरवठा असेल किंवा इतर आर्थिक बाबतचे निर्णय पार्श्वभुमीवर अत्यंत महत्वाचा म्हणुन ओळखल्या जातो. परदेश दौर्यावर जाताना राष्ट्रपती असोत की पंतप्रधान भारतीय संस्कृतीचं दर्शन, वस्तु उत्पादन, पुरातन वस्तु त्या राष्ट्राध्यक्षांना सन्मानाने देण्यासाठी घेवुन जातात आजवरचा इतिहास आहे. पंडित जवाहरलाल नेहरूपासुन इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग जेव्हा जेव्हा परदेशात जावुन आले काही ना काही वस्तू त्या पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षाला भेट देण्यासाठी ज्यामध्ये शिष्टाचार लपलेला असतो. त्याचाच एक भाग म्हणून इटालीत जाताना नरेंद्र मोदीजींनी त्या देशाच्या पंतप्रधान मेलोनी यांना स्वदेशी भारतीय उत्पादन ज्याची ओळख बाजारपेठेत मागच्या चाळीस वर्षापासून सर्वपरिचित होय. अर्थात मेलोडी चॉकलेटची गोडी, चव, सुमार दर्जा पाहिल्यानंतर खरंच मेलोडी एवढी चॉकलेटी का? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. एकेकाळी पार्ले बिस्किट हा ब्रँड देखील गाजलेला होता. खरं तर मोदीजी मेलोडी घेवुन गेले नव्हे तर त्यांना कल्पना सुचली भुषणावह गोष्ट म्हणावी लागेल. रूढी, परंपरा, संस्कृती पाहिल्यानंतर मामाच्या गावाला जरी आपण गेलो तरी रिकाम्या हाताने जात नाहीत ही संस्कृती आपली आहे. मात्र उलट्या काळजाच्या काँग्रेस नेतृत्वाला आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती याचं काही देणंघेणं नाही तो भाग वेगळा. मेलोनीला मेलोडी चॉकलेट भेटवस्तू दिल्यानंतर जगाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा मिळाली. एका दिवसात त्या कंपनीचे शेअर्स देखील वाढले. डिजिटल तंत्रज्ञानाचं युग असल्याने पंतप्रधानाच्या रिल्स देखील सोशल मिडियावर आदळल्या. 140 कोटी भारतीयांनी भुमिकेचं स्वागत केलं. मात्र राहुल गांधी राजकारणात दुर्योधनाची भुमिका निभावत असल्याने मेलोडीची प्रतिष्ठा सहन झाली नाही. परिणामी कपटनितीचा वापर करत काँग्रेसनं मेलोडीचीच छि-थु उडवायला सुरूवात केली. खरं तर स्वदेशीचा नारा मोदीजींनी बारा वर्षापुर्वीच दिला. आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा स्पर्धा वाढते त्यावेळी देशातील सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत किमान बाजारपेठेत राजकारण घुसवायला नको. पण काँग्रेसवाल्यांची मानसिकता विक्षिप्त असुन देशहितासाठी त्यांना काम करायचं नाही, सत्ताधार्यांच्या विरोधात अराजकता कशी वाढेल? आणि खोटा नरेटिव्ह सामान्य जनतेत कसा पसरेल? याशिवाय राहुल गांधीसह त्यांचे लंगे-सुंगे देखील दुसरं काही पहात नाहीत. अमेरिका, इराण, रशिया, युक्रेन युद्धाच्या सावटाखाली आपला देश वेगवेगळे आवाहन समोर उभे राहत असताना किमान संकटात तरी राजकारण करता कामा नये. मेलोडी चॉकलेट भारतीय उत्पादन स्वदेशी त्याला जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली तर राहुल गांधींच्या पोटात गोळा उठण्याचं कारण काय? एक चॉकलेटची बॅग इटालीच्या पंतप्रधानाला देताच मेलोडी केवळ देशात नव्हे जगाच्या कानाकोपर्यात जावुन पोहोचली. आश्चर्य म्हणजे रात्रंदिवस श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंकाताई इथपासुन त्यांचे सारे लंगे-सुंगे मेलोडी चॉकलेटचा आस्वाद घेतात. प्रवासात असताना संसदेत बसताना यांच्या तोंडी मेलोडीची गोडी आढळुन येते. मात्र केवळ चॉकलेटवरून भारतीय पंतप्रधानाला टार्गेट करायचं, नको तेवढी बदनामी सोशल मिडियावर करायची. ही कपटनिती महाभारतातल्या दुर्योधनापेक्षा दुप्पटीची म्हणावी लागेल. मुळात राहुल गांधींची मानसिकता देशाच्या लोकशाही विरोधात नेहमीच पहात आलो. परदेश दौर्यावर गेल्यानंतर अनेकदा त्यांनी भारतीय लोकशाहीचे धिंडवडे तिथे जावुन काढले. हे सारं केवळ राजकिय स्वार्थापोटीच म्हणावे लागेल. मुळात पारले कंपनीवाल्यांनी काँग्रेसवाल्यांचे काय बिघडवले? हेच कळत नाही. कालपरत्वे कंपनी मालकाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद घेतली नसेल असं नव्हे. राजकारणाचा भाग सोडा पण आज बिनडोक काँग्रेसवाले देशात आणि राज्यात मेलोडी चॉकलेट पुढे घेत रस्त्यावर उतरून तमाशा घालताना दिसतात. तरूणाईला उसकुन देत चॉकलेटची टिंगलटवाळी करताना दिसतात. इथे मात्र राष्ट्रभक्ती शरमेने मान खाली घातल्याशिवाय रहात नाही. देशप्रेम, स्वाभिमान या सार्या गोष्टी राजकिय स्वार्थापोटी काँग्रेसवाले गुंडाळुन ठेवु लागले आणि आपल्याच देशातील उत्पादनाचा रस्त्यावर उतरून तमाशा करणं म्हणजे स्वदेशी उत्पादकांचा जाहिर अपमान करणं यापेक्षा दुसरं काहीही नाही. काल नागपूरात युवक काँग्रेसनं मेलोडी चॉकलेटची रस्त्यावर उतरून टिंगलटवाळी केली. मनात प्रश्न हाच पडला की, काँग्रेसवाल्यांना थोडी लाज का वाटली नाही? एकीकडे पंतप्रधान स्वदेशी वस्तुचा गोडवा जगाला देवु करतात तर दुसरीकडे राहुल गांधी स्वदेशी वस्तुंचा रस्त्यावर उतरून तमाशा करतात. तिथं मात्र भारतमातेचा चेहरा आत्मक्लेषीत झाला हे नक्की. काँग्रेसच्या या कृतीमुळे देशातील 140 कोटी लोकांना मनोमन दु:ख होत आहे हे दुष्ट काँग्रेसवाल्यांच्या लक्षात देखील येणार नाही. आपल्या देशांतर्गत राजकिय कुरापती निश्चित कराव्यात पण आपल्याच उत्पादकांना वेठीस का धरावे? या प्रश्नाचे उत्तर राहुल गांधी देणार का? निमित्त मेलोडीचं असलं तरी काँग्रेसच्या एकुण कृतीमुळे भारतीय उत्पादकांचाच फार मोठा अपमान काँग्रेसवाल्यांनी केला असं म्हटलं तर चुक ठरणार नाही. चॉकलेटवर टिका करताना भारतीय स्वदेशीची गोडी राजकारणात हरवली ती केवळ काँग्रेसमुळे हे सत्य आता कुणीच नाकारू शकत नाही. आपल्या देशाचे शत्रु कोण? याचं जर सुक्ष्म दृष्टीकोनातुन निरीक्षण केलं तर खरे शत्रु देशाचे काँग्रेसवालेच 100 टक्के असं म्हटलं तर चुकीचं वाटण्याचं कारण नाही. भाजपाला विरोध करा, मोदीजींना विरोध करा पण भारतीय व्यापार्यांना, उत्पादकांना विरोध का करता? हा प्रश्न आता सामान्य माणुस काँग्रेसवाल्यांना विचारत आहे. - - राम कुलकर्णी,
भाजप प्रदेश प्रवक्ता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा