शिस्तबद्ध व मंगल वातावरणाच्या आदर्शाने शोभायात्रा लक्षवेधी
परळीत श्री.भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शानदार शोभायात्रा ; आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ शिस्तबद्ध व मंगल वातावरणाच्या आदर्शाने शोभायात्रा लक्षवेधी परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त परळी शहरात शानदार शोभायात्रा काढण्यात आली. आ. धनंजय मुंडे व नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते शोभा यात्रेचा शुभारंभ झाला. शांतता व शिस्तीच्या आदर्शाने शोभायात्रा लक्षवेधी ठरली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने हिंदू धर्मप्रेमी सहभागी झाले होते. सकल ब्राह्मण समाज यांच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संत जगमित्रनागा मंदिर येथुन शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्रारंभी आ. धनंजय मुंडे ,नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, आदी मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम प्रतिमेचे पूजन करून व माल्यार्पण करून शोभायात्रेस सुरूवात झाली. नेहरू चौक - राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक- गणेशपार -नांदूरवेस ...