इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

पौरोहित्य शिकणाऱ्या वेदोपासकांना (विद्यार्थी) शिष्यवृत्ती,विमा कवच आणि निवृत्ती वेतन देण्याचाही प्रयत्न

 जिल्हानिहाय परशुराम भवनची उभारणी: कॅ.आशीष दामले यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी -

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवनची उभारणी करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये परशुराम भवनसाठी जागा ताब्यात घेतली असून, त्याचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. वेदाध्यन, पौरोहित्य शिकणाऱ्या वेदोपासकांना (विद्यार्थी) शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर पौरोहित्य करणाऱ्यांना विमा कवच आणि निवृत्ती वेतनही देण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांनी महामंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज देणारी रमाबाई रानडे बचतगट अर्थसहाय्य योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी येथे दिली. अलिकडच्या काळात जे १७ ते १८ महामंडळे स्थापन झाली त्यातील तातडीने अध्यक्ष मिळालेले आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळालेले परशुराम महामंडळ एकमेव असल्याचा दावाही कॅ. दामले यांनी केला.

मराठवाडा दौऱ्यावर आलेले कॅ. दामले यांचा शुक्रवारी सकाळी पिसादेवी येथे सकल ब्राह्मण वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान आणि नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. महामंडळाच्या विविध योजना तयार करण्यात येत असून, त्यामध्ये वैयक्तिक स्वरुपातील १५ लाखांपर्यंतच्या कर्जाचा व्याज परतावा, ५० लाखांच्या गटकर्जाचा व्याज परतावा देण्याचा समावेश आहे. विभाग आणि जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या परशुराम भवनमध्ये आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या समाजातील वर्गाला मौंज, लग्नकार्य करता येणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारे शिक्षण केंद्र (स्टडी सेंटर), महिला बचतगटांना मार्गदर्शन करणारे केंद्र, गोशाळा, अशी रचना परशुराम भवनची राहणार असल्याचेही कॅ. दामले यांनी सांगितले.

पिसादेवीतील पारदेश्वर मार्गावरील कुलकर्णी लाॅन्स येथे आयोजित पार पडलेल्या कार्यक्रमात भारती देशपांडे यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला माेर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कीर्तनकार विनोद ‘कृष्ण’ शास्त्री नायगव्हाणकर, जिल्हा परिषद सदस्य आजीनाथ धामणे, माजी ग्रामपंचायत सदस्य मदन काळे, विलास कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी श्याम रामपूरकर, मोहन रेंगे, जीवन पाटील, सुरेश जोशी, मकरंद पाठक, जीवन जोशी, गणेश शर्मा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, समाजबांधवांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या