इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

परशुराम जन्मोत्सवा निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन...

लातूरमध्ये गृहउद्योग प्रदर्शनीचे परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन



महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी 'ब्रँडिंग' आवश्यक - नगराध्यक्षा सौ.पद्मश्री धर्माधिकारी

लातूर: प्रतिनिधी...

       महिलांमध्ये उपजतच उत्तम व्यवस्थापन कौशल्य असते. त्यांच्या घरगुती उत्पादनांना जर योग्य बाजारपेठ आणि ब्रँडिंगची जोड मिळाली, तर त्या जागतिक स्तरावर आपले नाव कोरू शकतात. अशा प्रदर्शनांमुळे महिलांच्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थाने बळ मिळते असे प्रतिपादन परळी वैजनाथ नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. 

      परशुराम जन्मोत्सव समिती-२०२६ आणि बीबीएन महिला मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने औसा रोडवरील कल्पतरु मंगल कार्यालय येथे आयोजित 'गृहउद्योग प्रदर्शनी'च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. शुक्रवारी मोठ्या उत्साहात या प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले. सौ पद्मश्रीताई. धर्माधिकारी यांनी पुढे बोलतांना सांगितले की, केवळ चूल आणि मूल यात न अडकता महिलांनी आपल्या छंदाचे रूपांतर व्यवसायात केले पाहिजे. परशुराम जन्मोत्सव समितीने महिलांसाठी उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ कौतुकास्पद असून, यामुळे स्थानिक उत्पादनांना मोठी चालना मिळेल. या प्रदर्शनीमध्ये विविध महिला बचत गटांनी तयार केलेले मसाले, घरगुती लोणची, हस्तकला, सुती कपडे आणि सजावटीच्या वस्तूंचे स्टॉल्स आकर्षणाचे केंद्र ठरले होते. लातूरकरांनी या प्रदर्शनीला भेट देऊन महिला उद्योजिकांचे कौतुक करावे असे आवाहन त्यांनी केले..

      परशुराम जन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संजय पांडे यांनी प्रास्ताविकात या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीबीएन महिला मंडळ आणि परशुराम जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला लातूरमधील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या