पोस्ट्स

इमेज
  ठोस आश्वासनाने रस्ते नुतनीकरण प्रश्न मिटला कार्यकारी अभियंता यांच्या आश्वासनाने आंदोलन तूर्तास स्थगित परळी / प्रतिनिधी अंबाजोगाई - मोहा - सिरसाळा व परळी - नागापूर - बोधेगाव - मोहा - सर्फराजपूर या दोन रस्त्यांचे तात्काळ अद्यवतीकरण करा या मागणीसाठी भारताच्या लोकशाहीवादी युवक संघटनेने रखरखत्या उन्हात म्हतारगाव फाटा कान्नापूर या ठिकाणी मागील पाच दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनास पाठींबा म्हणून या खराब मार्गाने बाधित गावकऱ्यांनी टायर जाळून बांधकाम विभागाचा निषेध केला. आंदोलनाची तीव्रता पाहता विभागाचे कार्यकारी अभियंता स्वामी, उपअभियंता मुंडे यांनी सोमवार दि 20 रोजी आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली. सुमारे दीड तास आश्वासक चर्चेअंती हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. परळी तालुक्यातील मोहा गावाला अंबाजोगाई आणि परळी या दोन्ही तालुक्याला जोडणा-या राज्य महामार्गाची अतिवृष्टीमुळे चाळणी होऊन या मार्गावरील पूल देखील खचले गेले आहेत. आरोग्य, शिक्षण, व्यापार आदी विविध कारणाने या मार्गावरुन हजारो नागरिकांची वर्दळ असताना जीव मुठीत घेऊन या मार्गावर प्रवास करावा लागत आहे. कार्य आदे...

आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

इमेज
लग्नाचे आमिष दाखवून चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर  लैंगिक अत्याचार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या केज :- केज तालुक्यात विदर्भातील चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत सात महिन्या पासून एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील एक कुटुंब हे मोल मजुरीसाठी केज तालुक्यातील एका गावात राहत आहे. त्याच गावातील एका तरुणाने त्या कुटुंबातील एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्याशी लग्न करण्याचे अमिष दाखवू त्याच्यावर १ सप्टेंबर २०२५ ते १४ एप्रिल २०२६ पर्यंत शेतात तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल्यास तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून त्या नराधम तरुणाच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. २०९/२०२६ भा. न्या. सं. ६५(१), ३५२ यासह पोक्सोचे कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत. _______________________________ आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या :- पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रक...

पौरोहित्य शिकणाऱ्या वेदोपासकांना (विद्यार्थी) शिष्यवृत्ती,विमा कवच आणि निवृत्ती वेतन देण्याचाही प्रयत्न

इमेज
  जिल्हानिहाय परशुराम भवनची उभारणी: कॅ.आशीष दामले यांची माहिती छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी - राज्यात प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवनची उभारणी करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये परशुराम भवनसाठी जागा ताब्यात घेतली असून, त्याचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. वेदाध्यन, पौरोहित्य शिकणाऱ्या वेदोपासकांना (विद्यार्थी) शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर पौरोहित्य करणाऱ्यांना विमा कवच आणि निवृत्ती वेतनही देण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांनी महामंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज देणारी रमाबाई रानडे बचतगट अर्थसहाय्य योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी येथे दिली. अलिकडच्या काळात जे १७ ते १८ महामंडळे स्थापन झाली त्यातील तातडीने अध्यक्ष मिळालेले आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळालेले परशुराम महामंडळ एकमेव असल्याचा दावाही कॅ. दामले यांनी केला. मराठवाडा दौऱ्यावर आलेले कॅ. दामले यांचा शुक्रवारी सकाळी पिसादेवी येथे सकल ब्राह्मण वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान आणि नंतर माध्यमा...
इमेज
  परतवाडा शोषण प्रकरणाचा जमाअत-ए-इस्लामी हिंद कडून निषेध न्याय आणि उत्तरदायित्वाची महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांची मागणी परळी वैजनाथ : प्रतिनिधी.... जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा (अचलपूर) येथील तरुणींशी संबंधित कथित लैंगिक शोषण आणि सायबर ब्लॅकमेल प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे परतवाडा (अचलपूर), अमरावती येथील तरुणींशी संबंधित कथित लैंगिक शोषण आणि सायबर ब्लॅकमेल प्रकरणाबाबत समोर आलेले तपशील अत्यंत गंभीर आहेत आणि जर हे आरोप सत्य ठरले, तर ते कायदा, नैतिकता आणि मानवी प्रतिष्ठेचे गंभीर उल्लंघन ठरतील. अशा प्रकारच्या शोषण, अत्याचार किंवा दबावाचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांनी सांगितले की,तरुणींना जाळ्यात अडकवणे, त्यांच्या खाजगी सामग्रीचे चित्रीकरण करणे आणि त्याचा ब्लॅकमेलसाठी वापर करणे ही अत्यंत घृणास्पद कृती आहे, जी न्याय्य आणि नैतिक समाजाच्या मूलभूत तत्त्वांना हादरवणारी आहे. इस्लाम मान, सन्मान आणि गोपनीयतेच्या संरक्षणाला सर्वोच्च महत्त्व देतो आणि अशा प्रकारच्या कृत्यांना पूर्णपणे अस्व...
इमेज
  मिशन कर्मयोगी' मध्ये महाराष्ट्राचा डंका राष्ट्रीय स्तरावर 'टॉप परफॉर्मिंग स्टेट' पुरस्काराने गौरव नवी दिल्ली, 17: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मिशन कर्मयोगी' उपक्रमांतर्गत  महाराष्ट्र राज्याने प्रशासकीय प्रशिक्षणात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. साधना सप्ताह २०२६ निमित्त आयोजित विशेष सोहळ्यात महाराष्ट्राला 'टॉप परफॉर्मिंग स्टेट' (उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य) या बहुमानाने सन्मानित करण्यात आले.कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तथा कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते साधना सप्ताह 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे मंत्रालय, विभाग आणि राज्यांचा सन्मान करण्यात आला. याच सोहळ्यात महाराष्ट्रातील 'यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी' (यशदा) या सं...

‘निरामय बीड अभियान’ वर सविस्तर चर्चा

इमेज
आरोग्य -‌ सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार - स्वानंद सोनार जिल्ह्यातील २5 स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठक ‘निरामय बीड अभियान’ वर सविस्तर चर्चा बीड , दि. ११७ एप्रिल : जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, रुग्णालये व स्वयंसेवी संघटनांनी एकत्रितपणे कार्य केल्यास आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचू शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्यस्तरीय वैद्यकीय समन्वयक डॉ. स्वानंद अरुण सोनार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभाग्रहात आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील समन्वयासाठी आयोजित मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मा.जिल्हाधिकारी विवेक जॉनसन , निवासी जिल्हाधिकारी  शिवकुमार स्वामी , डॉ. अजित विसपुते उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक, युवराज महाजन, संस्था समन्वयक,  मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बीड येथील वैद्यकीय अधिकारी  डॉ. कागदे चैतन्य , राहुल चव्हाण व गणेश गिराम  जिल्हा समन्वयक आणि जिल्ह्यातील २५  स्वयंसेवी संस्था व प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थ...

परशुराम जन्मोत्सवा निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन...

इमेज
लातूरमध्ये गृहउद्योग प्रदर्शनीचे परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी 'ब्रँडिंग' आवश्यक - नगराध्यक्षा सौ.पद्मश्री धर्माधिकारी लातूर: प्रतिनिधी...        महिलांमध्ये उपजतच उत्तम व्यवस्थापन कौशल्य असते. त्यांच्या घरगुती उत्पादनांना जर योग्य बाजारपेठ आणि ब्रँडिंगची जोड मिळाली, तर त्या जागतिक स्तरावर आपले नाव कोरू शकतात. अशा प्रदर्शनांमुळे महिलांच्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थाने बळ मिळते असे प्रतिपादन परळी वैजनाथ नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.        परशुराम जन्मोत्सव समिती-२०२६ आणि बीबीएन महिला मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने औसा रोडवरील कल्पतरु मंगल कार्यालय येथे आयोजित 'गृहउद्योग प्रदर्शनी'च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. शुक्रवारी मोठ्या उत्साहात या प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले. सौ पद्मश्रीताई. धर्माधिकारी यांनी पुढे बोलतांना सांगितले की, केवळ चूल आणि मूल यात न अडकता महिलांनी आपल्या छंदाचे रूपांतर व्यवसायात के...

समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार

इमेज
अतिक्रमण हटाव मोहिम : परळीतील व्यापाऱ्यांचा बैठकीत सकारात्मक प्रतिसाद ! नगर परिषद प्रशासन आणि व्यापारी यांच्या समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार परळी वैजनाथ | प्रतिनिधी        परळी नगर परिषदेकडून शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सध्या वेगाने सुरू असून, या पार्श्वभूमीवर मोंढा मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला व्यापाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.      अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी वाढते, ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण होते, अपघातांचा धोका वाढतो तसेच मान्सूनपूर्व नालेसफाईत अडथळे निर्माण होतात. याशिवाय शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मत सर्वच उपस्थितांनी मांडले.चर्चेदरम्यान वाढत्या अतिक्रमणामुळे शहराच्या विकासाला अडथळा निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका हा व्यापाऱ्यांनाच बसत असल्याचेही बैठकीत अधोरेखित झाले. ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....