आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

लग्नाचे आमिष दाखवून चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर  लैंगिक अत्याचार



आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

केज :- केज तालुक्यात विदर्भातील चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत सात महिन्या पासून एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील एक कुटुंब हे मोल मजुरीसाठी केज तालुक्यातील एका गावात राहत आहे. त्याच गावातील एका तरुणाने त्या कुटुंबातील एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्याशी लग्न करण्याचे अमिष दाखवू त्याच्यावर १ सप्टेंबर २०२५ ते १४ एप्रिल २०२६ पर्यंत शेतात तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल्यास तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून त्या नराधम तरुणाच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. २०९/२०२६ भा. न्या. सं. ६५(१), ३५२ यासह पोक्सोचे कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

_______________________________

आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या :- पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके आणि पोलिस कॉन्स्टेबल भागवत निरडे यांनी रात्री नराधम आरोपीला त्याच्या घरातून रात्री ताब्यात घेतले. आज त्याची चौकशी झाल्या नंतर त्याला न्यायालया समोर हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!