पोस्ट्स

इमेज
ग्लोबल विकास ट्रस्टच्या सहाय्यातून 30 गुंठ्यांत सव्वातीन लाखांचे उत्पन्न! लिंबू शेतीतून डिगंबर गडदे यांचा यशस्वी प्रयोग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी डिगंबर जिजाराम गडदे यांनी अल्पभूधारक असूनही आधुनिक पद्धतींचा अवलंब करत लिंबू शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केवळ 1 एकर शेती असलेल्या गडदे यांनी 2019 साली 30 गुंठे जमिनीत 100 लिंबूची रोपे लावून शेतीत नवा प्रयोग सुरू केला. या लिंबू बागेला लागवडीपासून अवघ्या 27 महिन्यांत फळधारणा सुरू झाली. ग्लोबल विकास ट्रस्टचे सुयोग्य मार्गदर्शन आणि गडदे यांनी केलेल्या नियोजनामुळे चालू वर्षात त्यांनी सुमारे 9 क्विंटल लिंबू उत्पादन घेतले आहे. सध्या बाजारात लिंबाला 125 रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळत असला तरी, कधी कधी हा दर 10 रुपयांपर्यंत घसरतो. अशा चढ-उतारांमध्येही गडदे यांना सरासरी 40 रुपये प्रति किलो दर मिळाला. लिंबू लागवडीतूनआतापर्यंत त्यांनी सुमारे 3.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, या शेतीसाठी त्यांचा एकूण खर्च केवळ 10 हजार रुपयांच्या आसपास राहिला आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना लिंब...

पालघर येथील 48 शेतकऱ्यांचे यशस्वी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण

इमेज
“कृषीकुल” आधुनिक शेतीचे विद्यापीठ; देशभरातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाचे केंद्र पालघर येथील 48 शेतकऱ्यांचे यशस्वी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ग्लोबल विकास ट्रस्टच्या सिरसाळा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या “कृषीकुल” शेतकरी प्रशिक्षण केंद्राने आधुनिक व शाश्वत शेतीचे एक प्रभावी आणि आदर्श मॉडेल उभे केले आहे. बीड जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता हे केंद्र आता संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. परिणामी, येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पारंपरिक शेतीतून मिळणारे मर्यादित उत्पन्न लक्षात घेता, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, पिक पद्धतीतील बदल आणि नव्या संधींचा शोध अत्यावश्यक ठरतो. याच दृष्टीने “कृषीकुल” शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध, सखोल आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन देत त्यांना सक्षम बनविण्याचे काम करत आहे. नुकतेच पालघर जिल्ह्यातील 48 शेतकरी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी कृषीकुल येथे दाखल झाले. या प्रशिक्षणात रेशीम शेतीचे सर्वांगीण मार्गदर्शन देण्यात आले...

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकांने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

इमेज
वसुंधरा दिनानिमित्त ‘वसुंधरा रक्षक अभियान’, महा आरपीईटी अभियानाचा शुभारंभ पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकांने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि. २२ : वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि वेगाने होणारे शहरीकरण याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना केवळ उपक्रम नसून एक जनआंदोलन बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित समारंभात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’, ‘महा-आरपीईटी अभियान, राज्य वातावरणीय कृती कक्षाच्या संकेतस्थळाचे अनावरण तसेच ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. वसुंधरा रक्षक अभियानाच्या लोगोचेही यावेळी अनावरण करण्यात आले. या लोगोची निर्मिती स्वतः मंत्री पंकजा मुंडे यांनी तयार केली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आ...

लाभार्थ्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एकाच छताखाली सर्व सेवा

इमेज
स्व.अजितदादा पवार यांच्या नावाने वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापनेचा निर्णय घेणारी परळी वैजनाथ नगर परिषद महाराष्ट्रात ठरणार पहिली! अभिनव सेवाउपक्रम: परळी नगर परिषदेच्या वतीने ‘स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ होणार स्थापन लाभार्थ्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एकाच छताखाली सर्व सेवा परळी वैजनाथ (प्रतिनिधी)       परळीत नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना शासकीय वैद्यकीय योजनांचा लाभ सुलभ, वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा या उद्देशाने नगर परिषद कार्यालयात “स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष” स्थापन करण्यास न.प.च्या स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली आहे.नगर परिषद स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.दरम्यान, अशा प्रकारचा स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेणारी परळी नगर परिषद महाराष्ट्रात पहिली नगर परिषद ठरणार आहे.       नागरिकांना विविध आरोग्य योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि पाठपुरावा यासाठी एकाच ठिकाण...

सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने विशेष गौरव सोहळा...

इमेज
  परळीत शानदार सोहळ्यात १९ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार ; संत -महंत, मान्यवर व समाजबांधवांची प्रचंड उपस्थिती सकल ब्राह्मण समाजाने केलेला माझा सन्मान हा तमाम परळीकरांचा सन्मान- नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी धर्म परायण व्यक्तिमत्व हे उपनयनासारख्या संस्कारांनीच रुजवले जाते - ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर परळी वै.(प्रतिनिधी)-       ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४६ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २२ एप्रिल रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला.शानदार सोहळ्यात मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या १९ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. या मंगलमय व पवित्र सोहळ्यासाठी संत -महंत, मान्यवर व समाज बांधवांची मोठी उपस्थिती लाभली. धर्मपरायण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आपले सोळा संस्कार असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांनी केले. तर सकल ब्राह्मण समाजाने केलेला माझा सन्मान हा तमाम परळीकरांचा सन्मान असल्याची कृतज्ञ भावना परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी याप्रसंगी व्...

१९ बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

इमेज
  परळीत ब्राह्मण सभेच्या वतीने आज ४६ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा विशेष गौरव: नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा होणार सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         येथील ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ४६ व्या सामुदायिक उपनयन संस्कार (मुंज) सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:५२ च्या शुभ मुहूर्तावर प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील लोकप्रतिनिधींचा, नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.        गेल्या ४५ वर्षांची प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष मान्यता आहे. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि मांगल्याच्या वातावरणात होणारा हा उपक्रम परळी नगरीचे भूषण मानला जातो. यावर्षीच्या सोहळ्यासाठी नोंदणी पूर्ण झाली असून एकूण २१ मुंज...

अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर या तरुणांनी उपोषणाचा मार्ग अंगीकारला

इमेज
  प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीचे दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू  अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर या तरुणांनी  उपोषणाचा मार्ग अंगीकारला  परळी वैजनाथ, प्रतिनिधी- परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये 'प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी' म्हणून शासन सेवेत सामावून घेण्याच्या न्याय मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवार, २० एप्रिलपासून वीज केंद्राच्या मुख्य इमारतीसमोर या युवकांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. ​परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांनी कुशल प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणार्थींना रिक्त पदांवर शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर या तरुणांनी  उपोषणाचा मार्ग अंगीकारला आहे.  ​या उपोषणामध्ये केशव दत्ता सरवदे, राधाकिशन देवराव सरवदे, करण भास्कर मुंडे, धनंजय बिभीषण फड, बालाजी राम बिडगर, समाधान माणिक मुंडे, मंगेश तुकाराम मुंडे, ओंकार गणेश फड, सुरेश बाळासाहेब फड ...

नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  परळीतील सांची बौद्ध विहारात भीमगीतांचा सांस्कृतिक महासोहळा  युवा नेते सचिन कागदे यांच्या पुढाकारातून जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम  नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त परळी शहर  ‘जय भीम’च्या जयघोषाने दुमदुमणार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन कागदे यांच्या पुढाकारातून शिवाजीनगर येथील सांची बौद्ध विहार, थर्मल रोड येथे भव्य दिव्य भीमगीतांचा सांस्कृतिक महासोहळा आयोजित करण्यात आला असून, गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात रंगणार आहे. या सोहळ्यात ‘काळजावर कोरले नाव’ फेम अजय देहाडे यांच्यासह चेतनकुमार चोपडे, सचिन भुईगळ, विजयजी पवार, विकास साळवे यांसारखे नामवंत गायक आपल्या दमदार आवाजातून भीमगीत व बुद्धगीत सादर करणार आहेत. त्यांच्या सुरेल सादरीकरणातून बाबासाहेबांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि सामाजिक क्रांतीचा संदेश रसिकांच्या मनात खोलवर रुजणार आहे. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची ज्योत अधिक तेजस्वी व्हावी, तसेच युवा पिढीने...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....