१९ बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

इमेज
  परळीत ब्राह्मण सभेच्या वतीने आज ४६ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा विशेष गौरव: नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा होणार सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         येथील ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ४६ व्या सामुदायिक उपनयन संस्कार (मुंज) सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:५२ च्या शुभ मुहूर्तावर प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील लोकप्रतिनिधींचा, नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.        गेल्या ४५ वर्षांची प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष मान्यता आहे. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि मांगल्याच्या वातावरणात होणारा हा उपक्रम परळी नगरीचे भूषण मानला जातो. यावर्षीच्या सोहळ्यासाठी नोंदणी पूर्ण झाली असून एकूण २१ मुंज...

नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 परळीतील सांची बौद्ध विहारात भीमगीतांचा सांस्कृतिक महासोहळा 



युवा नेते सचिन कागदे यांच्या पुढाकारातून जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम


 नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त परळी शहर  ‘जय भीम’च्या जयघोषाने दुमदुमणार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन कागदे यांच्या पुढाकारातून शिवाजीनगर येथील सांची बौद्ध विहार, थर्मल रोड येथे भव्य दिव्य भीमगीतांचा सांस्कृतिक महासोहळा आयोजित करण्यात आला असून, गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात रंगणार आहे.

या सोहळ्यात ‘काळजावर कोरले नाव’ फेम अजय देहाडे यांच्यासह चेतनकुमार चोपडे, सचिन भुईगळ, विजयजी पवार, विकास साळवे यांसारखे नामवंत गायक आपल्या दमदार आवाजातून भीमगीत व बुद्धगीत सादर करणार आहेत. त्यांच्या सुरेल सादरीकरणातून बाबासाहेबांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि सामाजिक क्रांतीचा संदेश रसिकांच्या मनात खोलवर रुजणार आहे.

समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची ज्योत अधिक तेजस्वी व्हावी, तसेच युवा पिढीने गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावेत, या उदात्त हेतूने सचिनभाऊ कागदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भीमगीतांच्या स्वरातून उपस्थितांना प्रेरणा, अभिमान आणि सामाजिक जाणीवेचा जागर अनुभवायला मिळणार आहे.

या सांस्कृतिक सोहळ्यात बाबासाहेबांच्या जीवनप्रवासावर आधारित विविध प्रेरणादायी गीते सादर होणार असून, वातावरण भारावून टाकणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल शहरात विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजक सचिन कागदे यांच्यासह शरण मस्के (रिपाई ता. अध्यक्ष), कार्तिक कांबळे (नगरसेवक), भीमराव पोळे, यशपाल मुंडे, रवी मुळे, बापू गायकवाड, बाबा सरोदे, संदीप मस्के, नट्टू शिंदे, अतिष अदोडे, प्रदीप भोकरे, कैलास तरकसे, नितीन धाटे, महादू गवारे, सनी देवडे, राम मुंडे, महेश आदमाने, अजय ढगे, कुमार डेंगळे व समस्त भीमसैनिक परळी यांनी केले आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही परळीत आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम होत असले, तरी हा भीमगीतांचा महासोहळा विशेष आकर्षण ठरणार असून, सांची बौद्ध विहार परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमणार, अशी भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....