१९ बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

 परळीत ब्राह्मण सभेच्या वतीने आज ४६ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा




विशेष गौरव: नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा होणार सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): 

       येथील ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ४६ व्या सामुदायिक उपनयन संस्कार (मुंज) सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:५२ च्या शुभ मुहूर्तावर प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील लोकप्रतिनिधींचा, नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.

       गेल्या ४५ वर्षांची प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष मान्यता आहे. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि मांगल्याच्या वातावरणात होणारा हा उपक्रम परळी नगरीचे भूषण मानला जातो. यावर्षीच्या सोहळ्यासाठी नोंदणी पूर्ण झाली असून एकूण २१ मुंजी निर्धारित करण्यात आल्या आहे. या पवित्र मंगल सोहळ्यासाठी भागवतमर्मज्ञ ह. भ. प.बाळूमहाराज उखळीकर यांची आध्यात्मिक उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने परळी वैजनाथ नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नगरसेवक पदी नवनियुक्त झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी आणि नवनियुक्त नगरसेवक देवीप्रसाद ऊर्फ राजा पांडे, दीनदयाळ ना.सह.बँकेचे नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन ॲड. राजेश्वर देशमुख, दीनदयाळ ना.सह.बँकेचे नवनिर्वाचित संचालक डाॅ.विवेक दंडे, वैद्यनाथ ना.सह.बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रकाश जोशी यांचाही गौरव केला जाणार आहे. तरी या उपनयन संस्काराच्या मंगलमय प्रसंगी आणि सत्कार समारंभास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा, परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

१९ बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

      विराज विश्वांभर देशमुख (मोगरकर), अभिमन्यु अनिल पांडे छ. संभाजीनगर, कृष्णा विनोद बांगर,चिन्मय अनिल बांगर, आकाश विठ्ठल पत्की टाकळगाव, अनंत विठ्ठल पत्की टाकळगाव,शिवम अशोक पुजारी, कृष्ण नंदकुमार भोपे धामोणी, आनंद श्रीकांत जोशी, मंगेश सुरेंद्र जोशी सेलु, अणर्व राजेश शेटे, शुभम मनिष पाटील कौठळी, गौरांग अमोल जोशी, स्वप्निल सतिश कुलकर्णी आदिलाबाद, समर्थ सचिन पाटील चाकुर, वरुण विजयराव देशपांडे परभणी, शंकर आबासाहेब घुगे पाथरुड, शुभम आबासाहेब घुगे पाथरुड, सार्थक राधेश्याम कुलकर्णी आवलगाव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....