अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर या तरुणांनी उपोषणाचा मार्ग अंगीकारला

 प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीचे दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू 




अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर या तरुणांनी  उपोषणाचा मार्ग अंगीकारला 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी- परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये 'प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी' म्हणून शासन सेवेत सामावून घेण्याच्या न्याय मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवार, २० एप्रिलपासून वीज केंद्राच्या मुख्य इमारतीसमोर या युवकांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.


​परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांनी कुशल प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणार्थींना रिक्त पदांवर शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर या तरुणांनी  उपोषणाचा मार्ग अंगीकारला आहे. 


​या उपोषणामध्ये केशव दत्ता सरवदे, राधाकिशन देवराव सरवदे, करण भास्कर मुंडे, धनंजय बिभीषण फड, बालाजी राम बिडगर, समाधान माणिक मुंडे, मंगेश तुकाराम मुंडे, ओंकार गणेश फड, सुरेश बाळासाहेब फड आणि मगरध्वज बिभीषण बिडगर यासह  प्रकल्पग्रस्तांचा समावेश आहे.

​हे सर्व उपोषणकर्ते परळी तालुक्यातील दाऊतपूर, वडगाव (दादाहारी), डाबी, इंदपवाडी आणि तळेगाव तसेच परिसरातील रहिवासी आहेत. जोपर्यंत शासन सेवेत सामावून घेण्याबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार या तरुणांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!