लाभार्थ्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एकाच छताखाली सर्व सेवा

स्व.अजितदादा पवार यांच्या नावाने वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापनेचा निर्णय घेणारी परळी वैजनाथ नगर परिषद महाराष्ट्रात ठरणार पहिली!

अभिनव सेवाउपक्रम: परळी नगर परिषदेच्या वतीने ‘स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ होणार स्थापन

लाभार्थ्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एकाच छताखाली सर्व सेवा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

      परळीत नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना शासकीय वैद्यकीय योजनांचा लाभ सुलभ, वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा या उद्देशाने नगर परिषद कार्यालयात “स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष” स्थापन करण्यास न.प.च्या स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली आहे.नगर परिषद स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.दरम्यान, अशा प्रकारचा स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेणारी परळी नगर परिषद महाराष्ट्रात पहिली नगर परिषद ठरणार आहे.

      नागरिकांना विविध आरोग्य योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि पाठपुरावा यासाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली “स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष” स्थापन  करण्यात येणार आहे.या कक्षाच्या स्थापनेसाठी लागणारा खर्च नगर परिषद निधीतून किंवा शासन अनुदानातून मंजूर करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर यंत्रणांशी समन्वय साधून नागरिकांना अधिकाधिक सुलभ  वैद्यकीय सहाय्यता देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या बैठकीला नगराध्यक्ष सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी,  स्थायी समिती सदस्य वैजनाथ सोळंके, प्रा पवन मुंडे, सौ.अंजलीताई माळी,सौ जयश्रीताई गीते, योगेश मेनूकुदळे यांच्यासह नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, सर्व अधिकारी, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

एकाच छताखाली उपलब्ध होणार सर्व सेवा...

    “स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध वैद्यकीय सहाय्यता योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत योजनेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच अर्ज स्वीकृती, कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन नोंदणी, संबंधित कार्यालयांशी समन्वय आणि लाभार्थ्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. या कक्षासाठी स्वतंत्र जागा, फर्निचर, संगणक, इंटरनेट, प्रिंटर आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय किमान एक प्रशिक्षित लिपिक/डेटा एंट्री ऑपरेटर आणि एक समन्वयक नियुक्त केला जाणार आहे.

लवकरच सुसज्ज वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यान्वित होणार....

      नागरिकांना योजनांची माहिती देण्यासाठी माहितीपत्रके, हेल्पलाईन क्रमांक व मार्गदर्शक फलक लावण्यात येणार आहेत. तसेच प्राप्त अर्जांची नोंद ठेवून त्यांचा वेळेत पाठपुरावा करणे बंधनकारक राहणार आहे. कक्षाच्या कामकाजाचा मासिक अहवाल तयार करून मुख्याधिकारी आणि स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. नगर परिषद स्थायी समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेत नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. या कक्षामुळे गरजू नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे. लवकरच नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्रातील पहिला सुसज्ज असा “स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!