पोस्ट्स

आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....

इमेज
तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईन आयडीद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद मुंबई: राज्यभरातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा पुरवणाऱ्या 'आपले सरकार सेवा केंद्रां'मधील (CSC) कामकाज सध्या तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाले आहे. महाऑनलाईन आयडीद्वारे (MahaOnline ID) मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने, या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी तांत्रिक पथक (Technical Team) युद्धपातळीवर काम करत असून लवकरच ...

महत्वपूर्ण निर्णय....

इमेज
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण २०२६ जाहीर. राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती. राज्यभरात एआयच्या संधीचे संतुलन साधण्यासाठी सहा एआय-उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. याशिवाय पाच एआय इनोव्हेशन सिटीज ची स्थापना होणार. महाराष्ट्राचे एआय पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणारे दमदार धोरण. (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग) सामजिक समता व समरसता वर्षा निमित्त साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय. कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार. (सामाजिक न्याय विभाग) हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना. राज्यात तीनशे कोटी वृक्ष लागवडीकरिता महत्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम. पायाभूत सुविधा उपक्रमांचे नियो...
इमेज
  तहसीलदार राकेश गिड्डे मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी बीड : केज येथील दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय व्यक्त होत असताना या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी अंबाजोगाईलातूर मार्गावर रेणापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात तहसीलदार गिड्डे यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात म्हणून नोंदविण्यात आले असले तरी या घटनेमागे काही संशयास्पद बाबी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे आली होती. नॅशनल ह्युमन राइट्स अँड क्राइम कंट्रोल ऑर्गनायझेशन व वुमन अँड चाइल्ड सेक्युरिटी वेल्फेअर फाउंडेशनच्या महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रिया रामेश्वर झांबरे यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सीआयडी चौकशीचे आद...

उपस्थित राहण्याचे आवाहन...

इमेज
  डी डब्ल्यू पी एस वंडरलैंड शाळेचा ना. पंकजाताई मुंडे, आ.धनंजय मुंडे  किरण गित्ते ,उषाताई किरण गित्ते यांच्या हस्ते २ मे रोजी उद्घाटन परळी( प्रतिनिधी )विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली  वर्ल्ड पब्लिक स्कूल वंडरलैंड शाळेचा मा. नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे मंत्री पशुसंवर्धन ,पर्यावरण आणि हवामान बदल ,महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री किरण गित्ते IAS सचिव  : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य उद्योग, वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा  सौ.उषाताई किरण गित्ते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे वार शनिवार 2 मे 2026 रोजी सायंकाळी 06:00 स्थळ डी डब्ल्यू पी एस वंडरलँड नाथ रोड परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे होणार आहे.                विवेकानंद  युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल वंडरलैंड परळी वैजनाथ या नवीन शाळेचा प्लेग्रुप, नर्सरी, जुनियर केजी ,सिनियर केजी या नवीन शाळेचा उद्घाटन समारंभ महारा...

दोन निवडणुका…पण परिस्थिती जैसे थे...

इमेज
ग्रामपंचायत पोटनिवडणूक: परळीतील अशी एक ग्रामपंचायत जिथे  दोन जागा… दोनदा निवडणूक… तरीही एकही अर्ज नाही! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      परळी वैजनाथ तालुक्यातील नागदरा-आनंदवाडी ग्रामपंचायतीची एक विलक्षण आणि विचार करायला लावणारी परिस्थिती समोर आली आहे.ग्रामपंचायतीतील दोन सदस्य पदांच्या जागांसाठी दोनदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊनही एकही अर्ज न आल्याने या जागा पुन्हा रिक्तच राहिल्या आहेत. विशेष म्हणजे, ही घटना एकदाच घडलेली नसून 2023 मधील सार्वत्रिक निवडणुकीतही याच दोन जागांसाठी एकही उमेदवार पुढे आला नव्हता. त्यानंतर अलीकडे झालेल्या पोटनिवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहिली.      या मागील कारण शोधले असता एक ठोस आणि संघटित भूमिका समोर आली आहे. नागदरा व आनंदवाडी या दोन गावांची मिळून ही  ग्रुप ग्रामपंचायत असून, एकूण 9 सदस्य पदांपैकी 5 जागा नागदरा तर 3 जागा आनंदवाडीच्या मतदारांवर आधारित आहेत. रिक्त राहिलेल्या दोन जागा या आनंदवाडीच्या वाट्याला येणाऱ्या असल्याने, त्या गावातील नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आनंदवा...

घातपाताचा दाट संशय:

इमेज
  सोनपेठ तालुक्यातील बेपत्ता तरुणाचा परळीजवळ विहिरीत आढळला मृतदेह ! संशयास्पद मृत्यू; कंबरेला दगड बांधलेला मृतदेह विहिरीत आढळला परळी वैजनाथ, प्रतिनिधी:         सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णू) येथून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी परळी तालुक्यातील इंजेगाव - सोनपेठ रस्त्यावर कॅनॉलच्या पलीकडील निर्जन ठिकाणच्या एका विहिरीत आढळून आला. मृताच्या कंबरेला मोठे दगड बांधलेले असल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.        महारुद्र व्यंकटराव शिंदे (वय २३) असे मृताचे नाव असून तो २३ एप्रिलपासून बेपत्ता होता. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. महारुद्रचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी आधीच व्यक्त केला होता. दरम्यान, आज सकाळी इंजेगाव -सोनपेठ रस्त्यावर  कॅनॉल पलीकडे असलेल्या एका विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घातपाताचा दाट संशय:        परळी...

वर्तणुकीवरून विचारले खडे सवाल.....

इमेज
  या लोकप्रतिनिधीने लाज आणली: अर्वाच्य अशोभनीय भाषा, धटिंगगिरी आणि अज्ञानी मुजोरपणा! परळीतील सामाजिक कार्यकर्त्याचे आमदार संजय गायकवाड यांना 'खुले पत्र'; वर्तणुकीवरून विचारले खडे सवाल परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... आपल्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना परळी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांनी एका जाहीर पत्राद्वारे चांगलेच धारेवर धरले आहे. "लोकप्रतिनिधीची भाषा, वर्तन आणि त्यांचा अभ्यास हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा असावा," अशा शब्दांत खडे बोल सुनावत इंगळे यांनी गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पत्र सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. अनंत इंगळे यांनी आपल्या पत्रात प्रामुख्याने आमदार गायकवाड यांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. पत्रात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समाजात एक आदर्श निर्माण करणे अपेक्षित असते. मात्र, संजय गायकवाड यांची भाषा आणि त्यांची शिवीगाळ करण्याची पद्धत ही लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात बसणाऱ्या व्यक्तीला शोभण...

कामगार दिनी....... मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  परळीत १ मे रोजी 'सीटू'चा भव्य कामगार मेळावा; कॉम्रेड किरण मोघे करणार मार्गदर्शन परळी (प्रतिनिधी):        जागतिक कामगार दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही परळी शहरात 'सीटू' (CITU) संलग्न कामगार संघटनांच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी  परळी वैजनाथ येथील जाजीवाडी विठ्ठल मंदिर येथे दुपारी १ वाजता हा मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती 'सीटू'चे अध्यक्ष प्रा. खाडे बी.जी. यांनी दिली आहे.       जागतिक कामगार चळवळीचा इतिहास आणि आपल्या देशातील कामगार चळवळीची सद्यस्थिती याबद्दल कामगारांमध्ये जनजागृती करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले जाते.यावर्षीच्या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य 'सीटू'च्या सचिव तथा घरकामगार संघटनेच्या राज्याध्यक्षा कॉम्रेड किरण मोघे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना त्यांच्या हक्कांची आणि भविष्यातील लढ्याची दिशा समजण्यास मदत होईल.   ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....