घातपाताचा दाट संशय:
परळीत १ मे रोजी 'सीटू'चा भव्य कामगार मेळावा; कॉम्रेड किरण मोघे करणार मार्गदर्शन
परळी (प्रतिनिधी):
जागतिक कामगार दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही परळी शहरात 'सीटू' (CITU) संलग्न कामगार संघटनांच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी परळी वैजनाथ येथील जाजीवाडी विठ्ठल मंदिर येथे दुपारी १ वाजता हा मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती 'सीटू'चे अध्यक्ष प्रा. खाडे बी.जी. यांनी दिली आहे.
जागतिक कामगार चळवळीचा इतिहास आणि आपल्या देशातील कामगार चळवळीची सद्यस्थिती याबद्दल कामगारांमध्ये जनजागृती करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले जाते.यावर्षीच्या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य 'सीटू'च्या सचिव तथा घरकामगार संघटनेच्या राज्याध्यक्षा कॉम्रेड किरण मोघे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना त्यांच्या हक्कांची आणि भविष्यातील लढ्याची दिशा समजण्यास मदत होईल.
परळी शहरातील आणि परिसरातील घरकामगार, बांधकाम कामगार, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि सर्व कष्टकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा. बी . जी.खाडे, किरण सावजी, जालिंदर गिरी, शेख जावेद, प्रकाश वाघमारे, यमुना पाथरकर, सुनिता ताटे, पद्मीन रणदिवे, सुमित्रा सावंत, हेमा काळे आणि सुवर्णा रेवले आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
---------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा