घातपाताचा दाट संशय:

 सोनपेठ तालुक्यातील बेपत्ता तरुणाचा परळीजवळ विहिरीत आढळला मृतदेह !

संशयास्पद मृत्यू; कंबरेला दगड बांधलेला मृतदेह विहिरीत आढळला

परळी वैजनाथ, प्रतिनिधी: 

       सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णू) येथून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी परळी तालुक्यातील इंजेगाव - सोनपेठ रस्त्यावर कॅनॉलच्या पलीकडील निर्जन ठिकाणच्या एका विहिरीत आढळून आला. मृताच्या कंबरेला मोठे दगड बांधलेले असल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

       महारुद्र व्यंकटराव शिंदे (वय २३) असे मृताचे नाव असून तो २३ एप्रिलपासून बेपत्ता होता. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. महारुद्रचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी आधीच व्यक्त केला होता. दरम्यान, आज सकाळी इंजेगाव -सोनपेठ रस्त्यावर  कॅनॉल पलीकडे असलेल्या एका विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

घातपाताचा दाट संशय:

       परळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली; मृत तरुणाच्या कंबरेला मोठे दगड बांधलेले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशानेच त्याला विहिरीत फेकले असावे, असा अंदाज  व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

कुटुंबाचा आधार हरपला:

        महारुद्र हा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा मृतदेह सापडल्याची बातमी कळताच आईने एकच टाहो फोडला, ज्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले. या हत्येमागील कारण काय? त्याला कोणी मारले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. परळी आणि सोनपेठ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच या गुढ मृत्यूचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....