इमेज
‘या’ तारखेला जाहीर होणार बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ( २ मे) ला जाहीर हाेणार आहे. निकालाच्या (Career) प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार असून शनिवारी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.

वर्तणुकीवरून विचारले खडे सवाल.....

 या लोकप्रतिनिधीने लाज आणली: अर्वाच्य अशोभनीय भाषा, धटिंगगिरी आणि अज्ञानी मुजोरपणा!


परळीतील सामाजिक कार्यकर्त्याचे आमदार संजय गायकवाड यांना 'खुले पत्र'; वर्तणुकीवरून विचारले खडे सवाल

परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

आपल्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना परळी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांनी एका जाहीर पत्राद्वारे चांगलेच धारेवर धरले आहे. "लोकप्रतिनिधीची भाषा, वर्तन आणि त्यांचा अभ्यास हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा असावा," अशा शब्दांत खडे बोल सुनावत इंगळे यांनी गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पत्र सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

अनंत इंगळे यांनी आपल्या पत्रात प्रामुख्याने आमदार गायकवाड यांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. पत्रात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समाजात एक आदर्श निर्माण करणे अपेक्षित असते. मात्र, संजय गायकवाड यांची भाषा आणि त्यांची शिवीगाळ करण्याची पद्धत ही लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात बसणाऱ्या व्यक्तीला शोभणारी नाही.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच नैतिकतेचे आणि सुसंस्कृतपणाचे राजकारण शिकवले. मात्र, गायकवाड यांचे वर्तन शिवरायांच्या शिकवणीच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे इंगळे यांनी पत्रात नमूद केले आहे. "ज्या राज्याने जगाला सुसंस्कृतपणाचा वारसा दिला, त्याच महाराष्ट्रात अशा भाषेचा वापर होणे ही खेदजनक बाब आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.

अनंत इंगळे यांनी विचारलेले सवाल हे केवळ एका आमदारापुरते मर्यादित नसून, घसरत चाललेल्या राजकीय भाषेच्या पातळीवर त्यांनी बोट ठेवले आहे. या जाहीर पत्रामुळे परळीसह संपूर्ण जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, सोशल मीडियावर अनेकांनी या भूमिकेचे समर्थन केले आहे.

काय आहे अनंत इंगळे यांनी लिहिलेले खुले पत्र.....

प्रति,

मा. आमदार संजय गायकवाड,

बुलढाणा,

महाराष्ट्र राज्य.

मा. आमदार महोदय,

जय जिजाऊ,जय शिवराय !

मी एक शिवप्रेमी नागरिक म्हणून आपणास हे पत्र लिहीत आहे.

अलीकडे काॅ. गोविंद पानसरे यांच्या “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या संदर्भात आपण प्रकाशकाला केलेली शिवीगाळ अत्यंत खेदजनक व अशोभनीय आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपली भाषा आणि वर्तन हे समाजासाठी आदर्श असावे, अशी अपेक्षा असते.परंतु आपण 40 वर्षापुर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं शिर्षक पाहुन मध्यरात्री फोन करून आपल्या कुटूंबासमोर अशी शिवीगाळ करता ही लाजिरवाणी बाब आहे.आपण ज्या शाळेत शिकलात त्या शाळेचं नाव 'शिवाजी विद्यालय' आपल्या पक्षाची घोषणा 'जय भवानी,जय शिवाजी' याचाही आपण खुलासा केला पाहिजेत.

इतिहासाचा अभ्यास, समीक्षा आणि मांडणी ही लोकशाही व्यवस्थेतील मूलभूत बाब आहे. मतभेद असू शकतात, परंतु त्यावर उत्तर देण्याची पद्धत सुसंस्कृत आणि तर्काधिष्ठित असणे आवश्यक आहे. छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून त्यांच्या विचारांचा सन्मान राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

,आपण ज्या पद्धतीने या पुस्तकावर आक्षेप घेतला, त्या पूर्वी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या “दगलबाज शिवाजी” तसेच जेम्स लेन यांच्या “Shivaji: Hindu King in Islamic India” या पुस्तकांवर आपण कधीही ठाम भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही. उलट जेम्स लेनच्या पुस्तकाचं शीर्षक व पुस्तकातील मजकुर कधीच वाचला नाही.यामध्ये महाराजांची व माँ जिजाऊंची बदनामी करण्यात आलेली आहे यावर चकार शब्द काढलेला कुठे ऐकिवात नाही. त्यामुळे आपल्या भूमिकेत सातत्य नसल्याची भावना शिवप्रेमी जनतेमध्ये निर्माण होत आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून आपण कोणत्याही विषयावर भूमिका घेताना राजकीय हेतू बाजूला ठेवून, वस्तुनिष्ठ आणि संतुलित दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. समाजात तेढ निर्माण करणारी भाषा वापरणे किंवा एकतर्फी भूमिका घेणे हे आपल्या पदाच्या मर्यादांना शोभणारे नाही.म्हणूनच आपणास विनंती आहे की,अशा विषयांवर बोलताना संयमित आणि सुसंस्कृत भाषा वापरावी खालील सर्वच पुस्तकाचं अगोदर वाचन व अध्ययन करावं व नंतर आपली भुमिका शीर्षक व पुस्तकातील आशयावरून आपली भुमिका घ्यावी.

इतिहासाबाबत मतभेद असल्यास तर्कशुद्ध चर्चा आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडावी. सर्व पुस्तकांबाबत समान निकष ठेवून सातत्यपूर्ण भूमिका घ्यावी.

आपण आपल्या विधानांचा पुनर्विचार करून शिवप्रेमी जनतेच्या भावना लक्षात घ्याल व काॅ.पानसरे अण्णांची व संबंध महाराष्ट्राची माफी मागाल अशी अपेक्षा आहे.

आपला

अनंत इंगळे,एक शिवप्रेमी

परळी,वैजनाथ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....