पोस्ट्स

३ जून..... गोपीनाथ गडावर साधेपणाने कार्यक्रम...

इमेज
लोकनेते मुंडे साहेबांचा उद्या स्मृतीदिन ; भजन, प्रसाद, सामाजिक उपक्रमांच आयोजन ना. पंकजा मुंडे, डाॅ. प्रितम मुंडे गोपीनाथ गडावर होणार नतमस्तक परळी वैजनाथ दि. ०२ -- लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा उद्या स्मृतीदिन असून गोपीनाथ गडावर त्यानिमित्त भजन, प्रसाद आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे, डॉ.प्रीतमताई मुंडे  हया परिवारासह उद्या याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.     सध्याची परिस्थिती आणि देशावर आलेले संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून यंदा मुंडे साहेबांची पुण्यतिथी आपापल्या गावात व घरीच करण्याचे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे,  त्यामुळे गोपीनाथ गडावर यंदा भव्य दिव्य कार्यक्रम नसला तरी यादिवशी भजन, प्रसाद व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे उद्या सकाळी १० वा. गोपीनाथ गडावर पोहोचणार आहेत. याठिकाणी त्या मुंडे साहेबांना आवडणा-या पदार्थाचा नेवैद्य समाधीसमोर अर्पण करणार आहोत. यावेळी आप...

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

इमेज
किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये  मुंबई, दि ३१ मे: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.  कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी: • शे...
इमेज
अंगरक्षकाचे पिस्टल काढून जीवे मारण्याचा प्रयत्न; दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल केज: मस्साजोग येथील गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपल्या शासकीय अंगरक्षकाचे अधिकृत पिस्टल काढून एका व्यक्तीच्या डोक्याला लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. या प्रकरणी समाधान खिंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणात एका साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असतानाच आता थेट पीडित कुटुंबातील मुख्य सदस्यावरच गंभीर गुन्हा नोंदवल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी धनंजय देशमुख यांनी अचानक त्यांच्या शासकीय अंगरक्षकाची पिस्टल काढून घेतली आणि ती थ...
इमेज
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश स्वतः भेट घेण्याची दाखवली तयारी ; जरांगे पाटील यांनी  कडक उन्हात उपोषणास बसणे प्रकृतीसाठी योग्य नाही मुंबई दि. ३० -- मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कडक उन्हात आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्यावी, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.     ना. पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून निर्देश दिले आहेत. ना. पंकजाताई म्हणाल्या की, मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी श्री मनोज जरांगे पाटील भर उन्हात जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्हाधिकारी जिल्हयाच्या प्रशासनाचे प्रमुख असतात, या नात्याने आपण त्यांची तात्काळ भेट घ्यावी अशी माझी सूचना आहे. अशा कडक उन्हात त्यांचं आमरण उपोषण त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही. स्वतः भेटण्याची दाखवली तयारी       जिल्हयाची पालकमंत्...

चार राज्यांतून भाविकांची हजेरी...१६ जूनपर्यंत चालणार धार्मिक सोहळा

इमेज
  श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज  'लघु आळंदी' येवती येथे अधिक मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम; हजारो भाविकांनी घेतला पुरणपोळी महाप्रसादाचा आस्वाद!  ​महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून भाविकांची अलोट गर्दी ​अमोल जोशी / अधिकमास विशेष.....                मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र व 'लघु आळंदी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवती येथील श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येथे अधिक महिन्याचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त गुरुवारी आयोजित महाप्रसादात सुमारे हजारो भाविकांनी तूप-पुरणपोळीचा आस्वाद घेतला. महाराजांच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी मठात भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. ​येवती येथील या पवित्र संस्थानात श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज यांची जागृत संजीवन समाधी आहे. अधिक महिन्यानिमित्त मठाधिपती श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज यांच्या पावन उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली रोज विविध धार्मिक विधी पार पडत आहेत. या...
इमेज
  परळीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिंडी रथयात्रेचे उत्साहात स्वागत नगराध्यक्षा सौ.पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते आरती  परळी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव दिंडी रथयात्रेचे २७ मे रोजी परळी शहरात भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीतील भाविकांनी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले असून दिंडीचा मुक्काम श्री संत जगमित्र नागा मंदिर येथे झाला. श्री संत जगमित्र नागा मंदिरात नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे दर्शन व आरती करण्यात आली. दिंडी आगमनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. २७ ते ३१ मे दरम्यान आयोजित ही दिंडी रथयात्रा श्रीक्षेत्र माळेगाव खंडोबा यात्रा (ता. लोहा, जि. नांदेड) येथून प्रारंभ होऊन श्रीक्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे पोहोचणार आहे. रथयात्रेचा पुढील प्रवास २८ मे रोजी परळीहून अंबाजोगाई, डिघोळ अंबा, चंदन सावरगाव व कुंबेफळ-केज मार्गे होणार आहे. त्यानंतर ...

दुःखद वार्ता...

इमेज
  गणेश कदम यांचे यांचे  निधन अंबाजोगाई: येथील व्यावसायिक तथा नगरसेवक महेश कदम व अनंत कदम यांचे बंधू गणेश जगन्नाथराव कदम यांचे २९ मे २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. या धक्कादायक बातमीमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.  गणेश कदम यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच ३० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता बोरूळ तलाव स्मशानभूमी, अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे.
इमेज
बरकतनगर भागात सरस्वती नदी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर; नगर परिषदेची मान्सूनपूर्व तयारी वेगात! माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी :    आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पूरस्थिती, पाण्याचा अडथळा आणि अस्वच्छतेचा त्रास होऊ नये यासाठी परळी वैजनाथ नगर परिषदेमार्फत बरकतनगर येथील स. नं. ७५ भागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीची मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. मानसूनपूर्व सुरू असलेल्या या कामांची माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्यासह त्या प्रभागातील संबंधित नगरसेवक व न. प.पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.        या मोहिमेअंतर्गत नदीपात्रातील गाळ, कचरा, झुडपे तसेच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारे घटक हटविण्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढून नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता, गती आणि स्वच्छतेबाबत आवश्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या