इमेज
  धनंजय देशमुख व खिंडकर यांच्यातील कथित पिस्तूल प्रकरणातील दोन्ही तक्रारी खोट्या; बीड पोलिसांचा तपास पूर्ण, होणार कायदेशीर कारवाई ​बीड: पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून कायद्याचा सर्रास गैरवापर करणाऱ्यांविरोधात बीड ग्रामीण पोलिसांनी आता कडक पाऊल उचलले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० मे २०२६ रोजी रात्री घडलेल्या कथित पिस्तूल दाखवून जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारी पूर्णपणे खोट्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी कायद्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती बीड पोलीस प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.   ​या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, मस्साजोग (ता. केज) येथील रहिवासी धनंजय पंडितराव देशमुख यांनी समाधान खिंडकर व इतर तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये पहिली तक्रार दाखल केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बेलवाडी येथील रहिवासी समाधान बाबु...

अंगरक्षकाचे पिस्टल काढून जीवे मारण्याचा प्रयत्न; दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल


केज: मस्साजोग येथील गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपल्या शासकीय अंगरक्षकाचे अधिकृत पिस्टल काढून एका व्यक्तीच्या डोक्याला लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. या प्रकरणी समाधान खिंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणात एका साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असतानाच आता थेट पीडित कुटुंबातील मुख्य सदस्यावरच गंभीर गुन्हा नोंदवल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी धनंजय देशमुख यांनी अचानक त्यांच्या शासकीय अंगरक्षकाची पिस्टल काढून घेतली आणि ती थेट खिंडकर यांच्या डोक्याला लावली. 'तुला जिवंत सोडणार नाही' अशी थेट धमकी देत त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कायदेशीर पावले उचलत गुन्हा दाखल केला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे संबंधित तपास अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असून धनंजय देशमुख यांच्यासोबत शासकीय अंगरक्षक तैनात करण्यात आला होता. मात्र, त्याच शासकीय सुरक्षेचा आणि शस्त्राचा गैरवापर करून धमकी दिल्याचा गंभीर आरोप आता समोर आल्याने पोलीस प्रशासनासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. आरोपीने अंगरक्षकाचे शस्त्र नेमके कशासाठी आणि कोणत्या वादातून काढले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या