परळीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिंडी रथयात्रेचे उत्साहात स्वागत



नगराध्यक्षा सौ.पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते आरती 

परळी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव दिंडी रथयात्रेचे २७ मे रोजी परळी शहरात भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीतील भाविकांनी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले असून दिंडीचा मुक्काम श्री संत जगमित्र नागा मंदिर येथे झाला.

श्री संत जगमित्र नागा मंदिरात नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे दर्शन व आरती करण्यात आली. दिंडी आगमनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

२७ ते ३१ मे दरम्यान आयोजित ही दिंडी रथयात्रा श्रीक्षेत्र माळेगाव खंडोबा यात्रा (ता. लोहा, जि. नांदेड) येथून प्रारंभ होऊन श्रीक्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे पोहोचणार आहे.

रथयात्रेचा पुढील प्रवास २८ मे रोजी परळीहून अंबाजोगाई, डिघोळ अंबा, चंदन सावरगाव व कुंबेफळ-केज मार्गे होणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी कपिलधार व लिंबागणेश, ३० मे रोजी सोनेगाव फाटा–पाटोदा–धनगर जवळका मार्गे, तर ३१ मे रोजी हळगाव येथे मुक्काम करून दुपारी श्रीक्षेत्र चौंडी येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

परळीतील स्वागत सोहळ्यावेळी दिगंबरराव धुमाळ, शिवाजीराव धुमाळ, अशोक धुमाळ, विनायक गडदे, ज्ञानोबा धायगुडे, प्रकाश धुमाळ, संजय धुमाळ, ॲड विजय धुमाळ ,,शरद धुमाळ प्रा. मुळे,आशा धुमाळ ,अनिता धुमाळ, सविता धुमाळ, गिरिजा धुमाळ ,शकुंतला धुमाळ ,स्वाती धुमाळ, निशा धुमाळ, सौ रोडे आदींसह अनेक भाविक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...