MB NEWS:परळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

 परळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

 


परळी, 25.....

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज 25 सप्टेंबर रोजी आदरणीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली,  आज दिनांक 25 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत सेवा कार्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे .आज  सकाळी 10 वा. छ.शिवाजी महाराज चौक व 10.30 वा. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी दिली. यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश चिटणीस राजेश देशमुख,प्रदेश महिला कार्यकारिणी सदस्या डॉ.शालिनीताई कराड, श्रीरामजी मुंडे,राजेशजी गीते, सुरेश माने, रवी कांदे, उमेश खाडे, लक्ष्मीकांत कराड, राजेंद्र ओझा,अरुण पाठक, चंद्रकांत देवकते, सतीश फड, फुलचंद मुंडे, योगेश पाडकर, सुभाष सावंत,गोविंद मोहेकर, गोविंद चौरे, नितीन मुंडे,गोपी कांगणे, दीपक गीते,शाम गीते,योगेश शिरसाट, चैतन्य मुंडे सह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार