युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:• नवनियुक्त पोलीस अधीक्षकांसमोर वाढत्या चोरीच्या घटनांचे आव्हान • *परळीत चोरांचा सुळसुळाट; उभ्या टॅन्करचे एक लाख बारा हजार रुपये किंमतीचे पाच टायर नेले काढून*

 • नवनियुक्त पोलीस अधीक्षकांसमोर वाढत्या चोरीच्या घटनांचे आव्हान •


*परळीत चोरांचा सुळसुळाट; उभ्या टॅन्करचे एक लाख बारा हजार रुपये किंमतीचे पाच टायर नेले काढून* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     परळी शहरात चोरांचा सुळसुळाट झाला आहे.चोरीच्या अनेक घटना घडत असताना काल रात्री चोरट्यांनी रस्त्यावर उभ्या टॅन्करचे पाच टायर काढून नेले असल्याची चोरीची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

     टॅन्करला सध्या काम उपलब्ध नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून राख वाहतूकीसाठी वापरले जाणारे टॅन्कर पेट्रोल पंपाच्या कोपऱ्यावर लावलेले होते. एम. एच. 44 यु 5999 क्रमांकाचे रत्नदिप काबने यांच्या मालकीचे हे वाहन आहे.काल दि.२३ रोजी रात्री ११ वा. काबने यांनी पहाणी केली तेंव्हा वाहन सुरक्षित होते.परंतु सकाळी पाचही टायर खोलून चोरी गेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.चोरी गेलेल्या टायरची किंमंत एक लाख बारा हजार रु. इतकी आहे.

     याप्रकरणी रत्नदिप काबने यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली शहर पोलिस या प्रकरणी चोरट्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

               Video       









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या