MB NEWS:मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

 मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण


मुंबई .....

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे.

"काल मी माझी कोविड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...'' असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!