युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:पंढरपूर येथील संत कैकाडी बाबा मठ संस्थानचे विश्वस्त हभप.संत रामदास महाराज (कैकाडी बाबा) यांना देवाज्ञा

 पंढरपूर येथील संत कैकाडी बाबा मठ संस्थानचे विश्वस्त हभप.संत रामदास महाराज (कैकाडी बाबा) यांना देवाज्ञा



पंढरपूर - श्रीक्षेत्र पंढरपूर येथील राष्ट्रीय संत हभप.कैकाडी बाबा उर्फ राजाराम महाराज यांचे पुतने तथा संत कैकाडी महाराज मठ संस्थानचे विश्वस्त हभप.संत रामदास उर्फ शिवराज महाराज जाधव यांचे आज शुक्रवार दि.२५ सप्टेंबर रोजी सायं.४-३० वा. सुमारास अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले.मृत्युसमयी ते ८० व्या वर्षें वयाचे होते.

             हभप.संत रामदास महाराज यांनी जीवनभर वारकरी संप्रदायाच्या समृद्ध विचारांचा वारसा समर्थपणे सांभाळला. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली ,पुतने, पुतण्या असा मोठा परिवार आहे.वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या