युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची रचना, धोरण लवकरच निश्चित करणार - धनंजय मुंडे*

 *लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची रचना, धोरण लवकरच निश्चित करणार - धनंजय मुंडे*





मुंबई (दि. २३) ---- : एका ऊसतोड मजुराच्या पोटी जन्माला आलो असल्याने मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांची जाण आहे, कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून ऊसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी निर्माण करण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना करून त्याचे धोरण (पॉलिसी) येत्या काही दिवसातच निश्चित करण्यात येतील. यावेळी ऊसतोड कामगारांच्या विविध संघटना, अन्य सामाजिक संघटना आदींना निमंत्रित करून सर्वांचे विचार व प्राप्त परिस्थितीचा विचार करून एक धोरण ठरवले जाईल असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


महिला किसान अधिकार मंच, जगण्याचे हक्क आंदोलन आणि जन आरोग्य अभियान या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगार महिलांच्या विविध प्रश्नी आयोजित राज्यव्यापी ऑनलाईन परिषदेत ना. मुंडे बोलत होते. यावेळी महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा आढाव हे परिषदेच्या अध्यक्ष स्थानी होते. 


तर वेबिनारच्या माध्यमातून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, डॉ. डी. एल. कराड, साथी सुभाष लोमटे, उलका महाजन, सीमा कुलकर्णी, मनीषा तोकले यांसह विविध सामाजिक संघटना, तसेच ऊसतोड कामगार संघटनांचे पदाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.


महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात या ऊसतोड कामगार महामंडळासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीत अनेक बाबींवर आर्थिक निर्बंध लागले. तरीसुद्धा अनलॉक च्या या टप्प्यांमध्ये ऊसतोड कामगार पुरुष व महिला यांची एकूण संख्या निश्चित करून त्यांची शासनाकडे नोंद असणे गरजेचे आहे. त्यांची महामंडळाकडे नोंद करून ओळखपत्र देणे, त्यानंतरच्या टप्प्यात नोंदणी झालेल्या सरसकट ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य विमा कवच देणे या बाबी प्रामुख्याने करणे हे आपले पहिले काम असणार आहे असेही ना. मुंडे म्हणाले.


ऊसतोड कामगार, महिला व त्यांच्या कुटुंबातील मुला मुलींचे शोषण होऊ नये यासाठी प्रभावी कायदा अमलात आणला जाईल, त्याचबरोबर कामगार कायद्याप्रमाणे ऊसतोड मजुरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी ऊस व साखरेवर 'सेस' लावण्यासाठीही महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


ऊसतोड कामगार महिलांना त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत व्यवस्थित सुविधा मिळत नाहीत, त्यांना अन्नधान्य व आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या महामंडळाच्या धोरणात विशेष तरतूद करून काही कल्याणकारी योजना सुरू करण्याचा मानस यावेळी ना. मुंडे यांनी व्यक्त केला.


आरोग्य सुविधा, विमा यासह स्त्री- पुरुष समानता कायद्यानुसार महिला व पुरुष ऊसतोड कामगारांना मिळणारे पैसे, त्यातील फरक, तसेच अर्धा कोयता पद्धती याबाबतही ठोस निर्णय घेण्याची आपली भूमिका असल्याचे ना. मुंडे म्हणाले.


ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी बाहेर असताना त्यांच्या कुटुंबातील मुलींचे शिक्षण थांबू नये तसेच अन्य कोणत्याही प्रकारच्या शोषणाला बळी पडू नये यासाठी सुरुवातीला ज्या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगार कुटुंबांची संख्या जास्त आहे असे तालुके निवडून ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी ५ वसतिगृहे/ निवासी शाळा उभारणे प्रस्तावित असून त्यांचे काम लवकरच सुरू करण्यात येईल असे धनंजय मुंडे यांनी विशेष नमूद केले. 


यावेळी या वेबिनार द्वारे उपस्थित डॉ. बाबा आढाव यांच्यासह महिला चळवळीतील व ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सर्वच अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज असून, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची ध्येय धोरणे निश्चित करताना सर्वांनाच निमंत्रित करून सर्वांच्या सूचनांचा बारकाईने विचार केला जाईल अशी खात्री ना. मुंडेंनी दिली.


ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवुन त्यांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी सध्या ऊसतोड कामगारांनी केलेल्या ऊसतोडणी दरवाढी संदर्भात देखील आपण साखर संघ व खा. शरदचंद्रजी पवार यांच्याशी चर्चा केली असून याबाबतचा सकारात्मक निर्णयही लवकरच घेतला जाईल असे आश्वासन या माध्यमातून विविध ऊसतोड कामगार संघटनांना ना. धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या