युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पंकजा मुंडे अहमदनगरमध्ये दाखल

 पंकजा मुंडे अहमदनगरमध्ये दाखल 


अहमदनगर, प्रतिनिधी.... माजी मंत्री भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून मौनात आहेत.आज पाथर्डी येथे त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.या पार्श्वभूमीवर मध्यरात्री उशीरा त्यांचे अहमदनगर मध्ये आगमन झाले आहे.

    आज अहमदनगर येथे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या आग्रहावरून त्यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली व स्वागत स्वीकारले. यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते.

      विधान परिषद निवडणुकीची  उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर मौनात गेलेल्या पंकजा मुंडे आज प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतरच  पंकजा मुंडे महाराष्ट्रात जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावतील. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये  त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. पंकजांची उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर शेकडो समर्थकांनी नाराजी बोलून दाखवली. काहींनी निदर्शनं केलं, रास्ता रोको केलं तर काहींनी सोशल मीडियातून धुसपूस बोलून दाखवली. पाथर्डीच्या एका कार्यकर्त्यानं तर थेट विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परळीप्रमाणेच पाथर्डीमध्ये मुंडे समर्थकांचा मोठा वर्ग आहे. यावेळी मोहटा देवीचंही दर्शन घेतील.


पंकजांच्या स्वागताची जय्यत तयारी

पंकजा मुंडे यांच्या मंगळवारच्या दौऱ्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पाथर्डी शहरात 20 कमानी तर 50 पेक्षा जास्त फ्लेक्स बोर्ड लागले आहेत. आजच्या दौऱ्यासाठी समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या