MB NEWS-गर्दीचा फायदा घेत चार महिलांचे मंगळसूत्र केले लंपास

 गर्दीचा फायदा घेत चार महिलांचे मंगळसूत्र केले लंपास



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         गजानन महाराज यांची पालखी परळी शहरात दाखल होण्यापूर्वी दादाहरी वडगाव येथे जायकवाडी वसाहत येथे  थांबली असता गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्शनासाठी आलेल्या चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविल्याची घटना पोलीसात नोंद झाली आहे.


पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संत गजानन महाराजांची पालखी दादाहरी वडगाव  जायकवाडी वसाहत येथे थांबली असता परिसरातील अनेकांनी  दिंडीत दर्शनासाठी गर्दी केली.या मध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती याच गोष्टींचा फायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा दिंडीत वळवून दिंडीत आलेल्या वासुदेव रामकिसन आघाव (वय ३३ वर्षे) यांच्या पत्नीचे व गावातील अन्य महिलांच्या गळ्यातील  सोन्याची मंगळसूत्रे असा एकूण ४६५०० चा ऐवज चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६५ / २०२२ कलम ३७९ भा.द.वी.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि झांबरे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार