युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-अग्नीपथ योजने विरूध्द माकप ची परळीत निदर्शने

 अग्नीपथ योजने विरूध्द माकप ची परळीत निदर्शने




परळी वै.ता.२४ प्रतिनिधी

     केंद्र सरकारने सैनिक भरतीसाठी सुरू केलेली अग्नीपथ योजना रद्द करा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता.२४) परळी तहसिल कार्यालया समोर निदर्शने केली.

                        Video news 



       केंद्र सरकारनी सैनिक भरतीमध्ये अग्नीपथ योजना सुरू करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा येउ शकते. देशात बेकारी मोठया प्रमाणात असताना केवळ चार वर्षासाठी सैनिक भरती करुण सुशिक्षीत बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखे आहे. केंद्र सरकारने तात्काळ अग्नीपथ योजना बंद करूण तात्काळ सर्वच क्षेत्रातील नोकरभरती सुरू करावी या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता.२४) परळी तहसिल कार्यालया समोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. नायब तहसिलदार बी एल रूपनर यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी माकपचे तालुका सचिव कॉ गंगाधर पोटभरे, कॉ बी जी खाडे, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ प्रभाकर नागरगोजे, कॉ सुदाम शिंदे, कॉ पप्पु देशमुख, कॉ मदन वाघमारे, कॉ मनोज देशमुख, कॉ प्रकाश चव्हाण, कॉ विष्णु देशमुख, शेख ईस्माईल आदींची उपस्थीती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या