युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळी येथे प .पू. वामनानंद महाराजांच्या पुण्यतिथीचे आयोजन

 परळी येथे प .पू. वामनानंद महाराजांच्या पुण्यतिथीचे आयोजन



 परळी , प्रतिनिधी.......

   उद्या ज्येष्ठ वद्य नवमी दि. २२ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे ब्र .ली. प .पू. वामनानंद गुरु पुरूषोत्तमानंद महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या महोत्सवाचा प्रारंभ सकाळी ७ .३० वा . श्री गुरु वामनानंद महाराजांच्या प्रतिमा पूजनविधीने होणार आहे . त्यानंतर  १० . ०० वा .श्रीगुरू पंचपदी प्रारंभ होईल. तसेच रवींद्र वेताळ महाराज यांचे किर्तन होईल. दुपारी १.०० ते ४ .०० पर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे .

     ब्राह्मण सभेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर देशपांडे गल्ली  येथे होत असलेल्या या पुण्यतिथी उत्सवास परळी व परिसरातील सर्व गुरू भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजन समितीने कळविले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या