MB NEWS-एकनाथ शिंदेंचा जगभर डंका: पाकिस्तान, सौदी अशा मुस्लिम देशांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक सर्च ट्रेंड

 एकनाथ शिंदेंचा जगभर डंका: पाकिस्तान, सौदी अशा मुस्लिम देशांमध्ये  ५० टक्क्यांपेक्षा अधिक सर्च ट्रेंड










Click -हे आवर्जून वाचा:🔘 *शिवसेना अॅक्शन मोडवर: आता 'आवाहन' नाही तर 'आव्हान'!*

शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या शिवसेनेविरोधातील बंडामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आले असून सध्या त्यांच्यासोबत ४५ हून आमदार गुवाहाटीला असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण देशात एकनाथ शिंदे पोहोचले असून कोण एकनाथ शिंदे याचा शोध घेतला जात आहे. याचे उत्तर मिळवण्यासाठी लोक थेट गुगलाच प्रश्न विचारत आहे.

Video news पहा:🛑 *'गण गण गणात बोते' चा जयघोष अन् परळीकर भाविकांचा हर्षोल्लास.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


 देशात एकनाथ शिंदेंचा सर्च ट्रेंड ६४ टक्के :


महाराष्ट्राशी संबंधित घडामोड असल्याने उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या तुलनेत देशात एकनाथ शिंदेंचा सर्च ट्रेंड ६४ टक्के आहे. तर शिवसेना आणि थेट उद्धव ठाकरेंना आव्हान केल्याने सध्या एकनाथ शिंदेची चर्चा सर्वत्र होताना दिसत असून पाकिस्तान आणि सौदी अशा मुस्लिम देशांमध्ये गेल्या तीन दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शिंदेंविषयी माहिती सर्च केली आहे.

 कोणत्या देशात शिंदेंचा ट्रेंड :


मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगात तब्बल ३३ देशांत ३ दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्च करण्यात आली. यामध्ये एकनाथ शिंदे टॉपवर होते. तर या शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये या देशांचा समावेश आहे. पाकिस्तानात ५४ टक्के,


सौदी अरेबियात ५७ टक्के,


मलेशिया ६१ टक्के,


नेपाळ ५१ टक्के,


बांगलादेश ४२ टक्के,


थायलंड ५४ टक्के, जपान ५९ टक्के,


कॅनडात ५५ टक्के लोकांनी सर्च केले आहे.


* कधी झाले शिंदे ट्रेंड :


२१ जून रोजी दुपारी अडीच वाजता एकनाथ शिंदेंचा ट्रेंडवर होता. २२ जून रोजी ते सूरतवरून गुवाहाटीला गेल्यानंतर हा गुगल ट्रेंड आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले. तर २२ जून रोजी दुपारी साडे बारावाजेपासून उद्धव ठाकरेंचा ट्रेंड सुरू होता. बुधवारी पत्रकार परिषदेनंतर रात्री साडे दहा वाजता ठाकरे सर्च ट्रेंडमध्ये एकनाथ शिंदेंच्या पुढे असल्याचे पाहायला मिळाले...

-------------+++---+++++++++++----------

VideoNews पहा:● *दिंड्या परळी वैजनाथ पंचक्रोशीत दाखल.*


क्लिक करा व वाचा: कोरोनाच्या व्यत्ययी दोन वर्षानंतर आषाढी वारीच्या दिंड्या परळीत दाखल ; भाविकांत भावभक्तीचा उत्साह*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार