MB NEWS-लाचलुचपत विभागाची सरकारी वकिलावर कारवाई

 लाचलुचपत विभागाची सरकारी वकिलावर कारवाई  


 धारूर.....

धारुरमध्ये लाचलुचपत विभागाने कारवाई करत एका महिला सहायक सरकारी वकीलास ताब्यात घेतले. पंधराशे रुपयाची लाच स्विकारताना बीड लाचलुचपत विभागाच्या  पथकाने आरोपीस रंगेहात पकडले. सदर कारवाई 20 सप्टेंबर  मंगळवारी रोजी दुपारी  करण्यात आली.

  कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या सुरेखा लांब (वायबसे) यांनी तक्रारदाराकडे निकालाची प्रत देण्यासाठी पंधराशे रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम तक्रारदाराकडून स्विकारत असताना धारुर न्यायालयात लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हि कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) पोलिस उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रविंद्र परदेशी व त्यांच्या पथकाने केली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार