MB NEWS-उत्सव आदिमायेचा, जागर स्त्री शक्तीचा"

  तेली समाज सार्वजनिक दांडिया उत्सवाचे आयोजन




परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)

           येथील तेली समाज सार्वजनिक दांडिया उत्सव समितीच्या वतीने उत्सव आदिमायेचा, जागर स्त्री शक्तीचा दांडिया उत्सवाचे आयोजन वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनि मंदिरात करण्यात आले असून या उत्सवात समाजातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने युवानेते पवन फुटके यांनी केले आहे.

                  शहरात यंदा प्रथयच तेली समाजाच्या वतीने वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिरात उत्सव आदिमायेचा, जागर स्त्री शक्तीचा दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२७ सप्टेंबर ते ४ आँक्टोबर दरम्यान फक्त महिला व मुलींसाठी दांडिया उत्सव २०२२ चे आयोजन रोज सायंकाळी ६ ते ८ दरम्यान मोफत करण्यात आले आहे. या उत्सवा दरम्यान महिलांसाठी स्पर्धा व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. तर दि.४ आँक्टोबर ला विशेष दांडियाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शनैश्वर महिला मंडळ व तेली समाज सार्वजनिक दांडिया उत्सव समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक शनैश्वर महिला मंडळ व पवन फुटके, सहकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार