MB NEWS-शिवाजी गायकवाड यांचा निरोप समारंभ

 शिवाजी गायकवाड यांचा निरोप समारंभ 



सिरसाळा (प्रतिनिधी)  येथील जि प के प्रा शा शिरसाळा येथे कार्यरत असलेले   शिक्षक शिवाजी कामाजी गायकवाड यांची बदली  जि .प नांदेड येथे झाल्यामुळे त्यांचा शाळेच्या वतीने सपत्निक सत्कार करण्यात आला.

 शाळेत शिस्तप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले गायकवाड यांना निरोप देताना विदयार्थी व सहकारी शिक्षक भावुक आले होते. यावेळी विद्यार्थी कु. खुशी कलीम पठाण व  कु.आरती विठ्ठल काळे  शिक्षिका श्रीमती महानंदा विटेकर सा. शि.लक्ष्मण वैराळ मुख्याध्यापक घोडके आदींनी मनोगत व्यक्त केले. सहकाऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवाजी गायकवाड यांनी दिली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम एम घोडके, शा.व्य.स.अध्यक्ष नासर दादा शेख केंद्रप्रमुख गंगाधर कांबळे आदींची उपस्थिती होती

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शिक्षक राम कडभाने ,नारायण जाधव ,डीडी पवार, महादेव राजमाने , संतोष अरबुणे,  विठ्ठल भुजबळ उषा देशमुख,लता चोपडे, मंगल माळी, कल्पना मुंडे, रोहिणी फड आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार