इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीराम लांडगे, उपाध्यक्षपदी विठ्ठल साखरे तर कार्याध्यक्षपदी नितीन झिरपे यांची निवड

 जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीराम लांडगे, उपाध्यक्षपदी विठ्ठल साखरे तर कार्याध्यक्षपदी नितीन झिरपे यांची निवड



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...

  

       शहरातील फुले चौक, देशमुख गल्ली भागातील जय महाराष्ट्र दुर्गोउत्सव मंडळाची एक व्यापक बैठक मुख्य मार्गदर्शक वैजनाथराव सोळंके, केशव जाधव, रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी पत्रकार श्रीराम लांडगे, उपाध्यक्षपदी विठ्ठल साखरे तर कार्याध्यक्षपदी नितीन झिरपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


        याबाबत माहिती अशी की, येथील फुले चौक, देशमुख गल्ली भागातील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने  आदिमाया, आदिशक्तीचा नवरात्रोत्सव गेल्या 34 वर्षापासून अतिशय भक्ती भावाने अविरतपणे साजरा केला जातो. भागामध्ये नवरात्र उत्सव दरम्यान सांस्कृतिक तसेच विधायक कार्यक्रमांमुळे आनंदी वातावरण असते. नुकतीच नवरात्र महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात  येथील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक घेण्यात येऊन तीत जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी पत्रकार श्रीराम लांडगे, उपाध्यक्षपदी विठ्ठल साखरे तर कार्याध्यक्षपदी नितीन झिरपे यांची  निवड करण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेली उर्वरित कार्यकारीनी पुढीलप्रमाणे मिरवणूक प्रमुख रमेश जाधव, शरद चव्हाण, सचिव तुकाराम वाकडे, सहसचिव पांडुरंग जाधव, प्रसिद्धी प्रमुख नरहरी सुरवसे, कोषाध्यक्ष स्वप्निल सुरवसे, सहकोषाध्यक्ष योगेश डहाळे, व्यवस्थापक बळीराम साखरे, ओमकार जाधव, हरी साखरे, अभिलाष साखरे आदींची निवड करण्यात आली.


       यावेळी मनोगत व्यक्त करताना दुर्गोत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम लांडगे तथा सहकाऱ्यांनी सांगितले की, दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने फुले चौक देशमुख गल्ली भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी मंडळाचे सदस्य सुरेश साखरे, महादेव जाधव, नरहरी सुरवसे, दिनेश परळीकर, पांडुरंग जाधव, विनोद देशमुख, दीपक देशमुख, गणेश क्षिरसागर, गणेश देशमुख, संतोष साखरे, गणेश नाईकवाडे, महेश खरोळकर, रवी जाधव, एकनाथ साखरे, वैभव देशमुख बळीराम साखरे, सतीश गावडे, महादेव पानखडे, मनोज गीते, गजानन पानखडे, योगेश पानखडे, राजेश सुरवसे, राहुल सुरवसे, पवन सुरवसे, हरीश साखरे, ओमकार जाधव, महेश साखरे, ऋषी कदम, सिद्धेश्वर कदम, अशोक सरवदे, योगेश साखरे, पवन साखरे  अभिलाष साखरे विकास कदम चैतन्य पानखडे सुमित जाधव आदींसह विविध मान्यवर प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक भक्तांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या