युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-दहावी आणि बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

 दहावी आणि बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे, : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होईल अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

राज्य मंडळातर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात दहावी तसेच बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते. परंतु मार्च 2020 मध्ये कोरोना आल्यानंतर पुढील दोन वर्षे संभाव्य वेळापत्रकच जाहीर करण्यात आले नव्हते. यंदा मात्र पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणार्‍या सूचनांवर विचार केला जाणार नाही. तसेच संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्याचे देखील मंडळाने स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या