पोस्ट्स

जुलै १९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ना. पंकजाताई मुंडे वाढदिवस>>>>प्रदीप कुलकर्णी यांचा विशेष अभिष्टचिंतन लेख

इमेज
  लोकनेत्याचा खरा वारसा ! ✍️ प्रदीप कुलकर्णी        महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने, आक्रमक नेतृत्वाने आणि जनमानसातील अढळ स्थानाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नेत्या म्हणजेच मा. पंकजाताई मुंडे... लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा राजकीय आणि सामाजिक वारसा तितक्याच ताकदीने पुढे नेणाऱ्या पंकजाताईंनी केवळ 'वारसदार' म्हणून नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे. ​लोकनेते मुंडे साहेबांच्या मुशीत घडलेल्या पंकजाताईंनी राजकारणाचे धडे घरातूनच गिरवले. मात्र, त्यांच्यातील नेतृत्वाची खरी चुणूक २००९ मध्ये महाराष्ट्राने पाहिली, जेव्हा त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत विधानसभेत पाऊल ठेवले. मुंडे साहेबांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली मोठी पोकळी आणि दुःख पचवत, त्यांनी केवळ स्वतःलाच सावरले नाही, तर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांना आणि वंचित, उपेक्षित, कष्टकरी ऊसतोड कामगारांना धीर दिला. ​  ​२०१४ ते २०१९ या काळात राज्याच्या ग्रामविकास, जलसंध...

संभाजीनगर पोलिसांनी केली धडक कारवाई...

इमेज
मुद्देमाल जप्त : परळीत गावठी हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टीची दारू बाळगून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून गावठी हातभट्टीची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण पुलाखालील पत्र्याच्या शेडजवळील मोकळ्या जागेत आरोपी हा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून आला. त्यानुसार कारवाई करताना आरोपीच्या ताब्यातून ४० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक कॅनमध्ये एकूण ८० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगून तिची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाल्याने संभाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी साजिद हबीब खान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष सूर्यभान गायकवाड (वय २६, रा. शिवाजीनगर, परळी वैजनाथ) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. केदार यांच्य...
इमेज
  धडक कारवाई : परळीत अवैध गोमांस विक्री उघड ;संभाजीनगर पोलिसांनी टाकला छापा  परळी वैजनाथ | प्रतिनिधी         परळी शहरातील उड्डाण पुलाजवळील मच्छी मार्केट परिसरात अवैधरित्या गोमांस विक्री उघड झाली असून संभाजीनगर पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाविरुध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.५० वाजता उड्डाण पुलाच्या उत्तर बाजूस असलेल्या मच्छी मार्केट परिसरात आरोपी हा विनापरवाना गोमांस विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकून कारवाई करण्यात आली.या कारवाईत २५ किलो गोमांस (किंमत ७,५०० रुपये), विक्रीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी तराजू व वजनमापे,लोखंडी सुरा आदी साहित्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पोशेट्टी पुजरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सईद जमील कुरेशी (वय २४, रा. आझादनगर, परळी वैजनाथ, जि. बीड) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ मधी...

सुशील धोकटे यांच्या प्रकृतीची केली आत्मीयतेने विचारपूस..

इमेज
धनंजय मुंडे स्वतःच्या केअरटेकरचीही ‘केअर’ घेतात तेव्हा.... सुशील धोकटे यांच्या प्रकृतीची केली आत्मीयतेने विचारपूस; उपचारासाठीही केली विशेष व्यवस्था परळी : ‘आपल्या माणसांची साथ फक्त कामापुरती नसते, तर सुख-दुःखातही असते,’ याची प्रचिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा दिली. गेली तीन दशके त्यांच्यासोबत निष्ठेने काम करणारे सहकारी सुशील धोकटे आजारी असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेत आपुलकीचा वेगळाच आदर्श घालून दिला. सुशील धोकटे हे मागील सुमारे ३० वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्यासोबत कार्यरत आहेत. केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर मुंडे कुटुंबातील सदस्य म्हणूनच त्यांची ओळख आहे. साहेबांच्या दैनंदिन दिनक्रमापासून औषधे, आहार, प्रवास, बैठका, कुटुंबीय व कार्यकर्त्यांशी संपर्क, तसेच स्वीय सहाय्यक म्हणून विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या ते अत्यंत निष्ठेने पार पाडत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रवासादरम्यान सुशील धोकटे यांची प्रकृती अचानक बिघडली. मात्र, साहेबांच्या कार्यक्रमात अडथळा...

सर्व आरोग्यविषयक उपक्रम गावागावात प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन...

इमेज
'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाला गती; परळीत तालुकास्तरीय कृती दल समितीची उत्साहात  बैठक  परळी वैजनाथ | प्रतिनिधी ' माझं गाव, आरोग्य संपन्न गाव ' अभियानांतर्गत जुलै २०२६ महिन्यासाठी नियोजित आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय कृती दल समितीची बैठक गुरुवार, दि. २३ जुलै रोजी पंचायत समिती, परळी वैजनाथ येथे उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले होते, तर सहअध्यक्ष म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी सचिव म्हणून कामकाज पाहिले. बैठकीस तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, तालुका विस्तार अधिकारी (पंचायत) तसेच पत्रकार प्रतिनिधी आदी उपस्थित होते.बैठकीत सर्वप्रथम जून २०२६ महिन्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य संपन्न गाव समित्यांच्या बैठका, शाळा व अंगणवाडीतील स्वच्छता मोहीम, योग शिक्षण...
इमेज
एक वर्षाची सक्तीची सामाजिक दायित्व सेवा रद्द; एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील शासकीय, महानगरपालिका, शासन अनुदानित तसेच विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएस पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली एक वर्षाची सक्तीची सामाजिक दायित्व सेवा (Social Responsibility Service) रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून, यामुळे हजारो नवोदित डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणे आणि करिअरची वाटचाल सुरू करणे अधिक सुलभ होणार आहे. शासन निर्णयानुसार, सामाजिक दायित्व सेवा पूर्ण केल्याशिवाय पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्रता मिळत होती. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयांची वाढती संख्या, दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि सामाजिक दायित्व सेवेसाठी उपलब्ध पदांची मर्यादा यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ही सेवा वेळेत पूर्ण करता येत नव्हती. परिणामी, पदव्युत्तर शिक्षणात प्रवेश घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ ब...
इमेज
  गुजरातमधील पुरात अडकलेल्या ३५  पर्यटकामध्ये परळीतील दोघांचा समावेश; सुखरूप सुटका   आ. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या तत्परतेने कुटुंबियांचा झाला संपर्क परळी वैजनाथ | प्रतिनिधी       गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात नदीला आलेल्या अचानक पुरामुळे महाराष्ट्रातील सुमारे ३५ पर्यटक अडकल्याची घटना घडली. मात्र, गुजरात प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टरद्वारे बचाव मोहीम राबवत सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. या पर्यटकांमध्ये परळी वैजनाथ येथील रुपेश झंवर व त्यांची पत्नी जान्हवी झंवर या दाम्पत्याचाही समावेश होता. या पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या या दाम्पत्यांचा संपर्क तुटला होता.त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंताग्रस्त होते.मात्र याबाबत आ.धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने तातडीने संबंधित गुजरात प्रशासनाशी संपर्क केला.संबधित छावणी व त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत झंवर दाम्पत्यांचा संपर्क करून दिला.      खासगी ट्रॅव्हल बसने  प्रवास करत असतांना वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीला आलेल्या पुरामुळे बसचा मार्ग बंद झाला आणि पर्यटक अडकून पडले....
इमेज
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत बाल रुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच आर्थिक सहाय्य त्रिपक्षीय करारातून राज्यातील २०० बालरुग्णांना मिळणार लाभ  मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. महागड्या निदान चाचण्यांमुळे उपचार प्रक्रियेत होणारा विलंब टाळून कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमांतर्गत राज्यातील २०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्करोगग्रस्त बालरुग्णांना निदानासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.        या लाभाअंतर्गत ० ते १८ वयोगटातील पात्र बालरुग्णांना कर्करोगाचे निदान निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक तसेच पुढील खर्चिक वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या सहाय्यामुळे आर्थिक अडचणींमुळे निदान प्रक्रियेत ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर शासन आदेश निर्गमित

इमेज
ना.पंकजा मुंडे यांनी मानले आभार ; परळीतील नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला शासनाची १३ हेक्टर जमीन विनामूल्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर शासन आदेश निर्गमित मुंबई दि. २२ -- परळी येथे नव्याने होत असलेल्या पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय उभारण्यासाठी १३ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून तसा शासन आदेश महसूल व वन विभागाने निर्गमित केला आहे. दरम्यान या निर्णयाबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचे आभार मानले आहेत.      परळीच्या सर्व्हे क्रमांक ४७८ मधील १३ हेक्टर शासकीय जमीन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या नियंत्रणाखालील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना 'भोगवटादार वर्ग-२' या अटीवर विनामूल्य व महसूलमुक्त स्वरूपात हस्तांतरित करण्यात येणार आहे. महसूल विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४० तसेच संबंधित नियमांनुसार ही जमीन प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. छत्रपती...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन

इमेज
परळी वैजनाथ बसस्थानकातील चिखल, खड्ड्यांमुळे प्रवासी बेहाल; तातडीने उपाययोजना करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन परळी वैजनाथ | प्रतिनिधी...      परळी वैजनाथ येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या नवीन बसस्थानकाच्या कामामुळे तसेच पावसामुळे सर्वत्र चिखल, पाण्याचे डबके आणि मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा नियन्त्रण प्रमुख दुसानी मॅडम  परळी आगार प्रमुख सोनवणे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी  बीड जिल्हा नियंत्रण प्रमुख दुसानी मॅडम व आगार प्रमुख सोनवणे  साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करत बसस्थानक परिसरातील चिखल व खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली. पावसामुळे प्रवाशांचे पाय चिखलात रुतत असून अनेकांना घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग...

सकाळी सकाळीच वार्ता वार्यासारखी पसरली....

इमेज
  खळबळजनक : परळीच्या शक्तीकुंज वसाहतीत सापडला तुटलेला मानवी पाय ; नेमका प्रकार काय? परळी वैजनाथ | प्रतिनिधी     परळी वैजनाथ शहरातील शक्तीकुंज वसाहतीत आज सकाळी मानवी तुटलेला पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळच्या वेळी ही माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरताच "हा पाय कोणाचा?", "नेमके काय घडले?" अशा चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.     घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मानवी अवयव वसाहतीत कसा आला, याचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान शक्तीकुंज वसाहतीलगत असलेल्या रेल्वे मार्गावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.रेल्वे पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, मृतदेहाचा एक पाय गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर वसाहतीत सापडलेला तुटलेला पाय आणि रेल्वे रुळावरील मृतदेह यांचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार, रेल्वे रुळाजवळील मृतदेहाचा तुटलेला पाय भटक्या कुत्र्यांनी ओढत शक्तीकुंज वसाहतीत आणला असावा, असा अंदाज पोलिसांकडून ...
इमेज
दुकानात घुसून व्यापाऱ्याला मारहाण;  तिघांविरुद्ध गुन्हा परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील रामा आईस्क्रीम पार्लर, गणेशपार रोड परिसरातील दुकानात घुसून व्यापाऱ्याला मारहाण करत  तोडफोड केल्याप्रकरणी तिघांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरक्षनाथ सोनाजी मोरे (वय ३२, व्यवसाय–व्यापार, रा. देशमुखपार, परळी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. १९ जुलै) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते त्यांच्या दुकानात असताना तीन चार जण   दुकानात आले.आरोपींनी बेकरीतील केक व इतर साहित्य घेतल्यानंतर पैशांवरून वाद घालत फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच दगडफेक करून दुकानात नुकसान केले.  आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिलीस तर तुला सोडणार नाही ,अशी धमकीही  दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी शिवा दीपक जगतकर, महादू राधाकिशन शिंदे, लांडगे (पूर्ण नाव माहिती नाही) व एक अनोळखी साथीदार  यांच्याविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रम...

स्पर्धेचे आयोजक तथा भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे यांची माहिती...

इमेज
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी चित्रकला स्पर्धा  परळी वैजनाथ– महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिजामाता उद्यान, परळी वैजनाथ येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा दोन गटांत होणार असून, पहिल्या गटात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'रंग भरण' स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या गटात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण, जलसंवर्धन काळाची गरज, 'जल है तो कल है', स्मरणचित्र आणि पशुसंवर्धन या विषयांवर चित्रकला स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ₹5,000, द्वितीय क्रमांकासाठी ₹3,000 आणि तृतीय क्रमांकासाठी ₹2,000 अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे....

भाजप शहराध्यक्षा सौ. उमाताई चंद्रकांतअप्पा समशेट्टे यांनी दिली माहिती...

इमेज
ना. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत आठवडाभर सेवाभावी उपक्रमांची रेलचेल परळी वैजनाथ | प्रतिनिधी       महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा लोकप्रिय लोकनेत्या ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, परळी शहराच्या वतीने दि. २२ ते २८ जुलै या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजहिताला प्राधान्य देत नागरिकांसाठी उपयुक्त सेवा उपक्रमांची मालिका राबविण्यात येणार असून, या माध्यमातून वाढदिवस सेवाभावी पद्धतीने साजरा केला जाणार आहे.भाजप शहराध्यक्षा सौ. उमाताई चंद्रकांतअप्पा समशेट्टे यांनी नागरिकांना या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात दि. २२ जुलै रोजी जिजामाता उद्यान येथे चित्रकला स्पर्धेने होणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवीसाठी रंगभरण स्पर्धा, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण, जलसंवर्धन, 'जल है तो कल है', स्मरणचित्र व पशुसंवर्धन या विषयांवर चित्रकला स्पर्धा होणार आहे. दि. २३ जुलै रोजी श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्या...

चंद्रपूर परिसरातील प्रदूषण जास्तीत जास्त नियंत्रणात आणण्यासाठी उद्योगांना स्पष्ट व कडक निर्देश

इमेज
  चंद्रपूर, यवतमाळमधील प्रदूषणावरील उपाययोजनांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा- पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश केवळ चर्चेवर भर न देता कृतीवर भर:अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश चंद्रपूर परिसरातील प्रदूषण जास्तीत जास्त नियंत्रणात आणण्यासाठी उद्योगांना स्पष्ट व कडक निर्देश  मुंबई, दि. २० : चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाणी व कोल वॉशरीजमुळे हवेची व पाण्याची गुणवत्ता घसरून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. केवळ चर्चेवर भर न देता, प्रत्यक्ष कृतीसाठी तीन टप्प्यांत कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रांत कार्यरत असलेल्या उद्योगपतींच्या शिष्टमंडळासोबत कोल वॉशरीज तसेच कोळसा खाणींमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात मंत्री मुंडे यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रदूषणाची सद्यःस्थिती, प्रदूषण होण्याची प्रमुख कारणे आणि त्यावर करण्...

जयंती उत्सवाचे अध्यक्ष सुनील मस्के यांची माहिती.

इमेज
  माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांना अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे निमंत्रण जयंती उत्सवाचे अध्यक्ष सुनील मस्के यांची माहिती परळी वैजनाथ | प्रतिनिधी      साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवानिमित्त साठे नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित सार्वजनिक जयंती महोत्सवासाठी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांना सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने अधिकृत निमंत्रण देण्यात आले. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत, प्रमुख उपस्थिती लाभावी अशी विनंती धनंजय मुंडे यांच्याकडे केली. धनंजय मुंडे यांनी निमंत्रणाचा स्वीकार करत सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.या प्रसंगी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल मस्के, निवास मस्के, महादेव मस्के, संतोष मस्के, गुलाब शिरसागर, नागेश मस्के, ज्येष्ठ नेते हनुमंत गायकवाड, संपादक अभिमान मस्के, डॉ. माणिक कांबळे तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. साठे नगर सार्वजन...

३१ जुलै रोजी पुन्हा घेणार आढावा.....

इमेज
परळी वैद्यनाथ मतदार संघातील मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) नोंदणी ३१ जुलै पर्यंत पूर्ण करा - धनंजय मुंडे मतदारांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी बूथ लेव्हल एजंटांना धनंजय मुंडेंकडून सूचना परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - मतदारांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने शासनाने मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियान २००२ सालानंतर तब्बल २४ वर्षांनी राबवले असून यामध्ये प्रत्येक पात्र नागरिकांचे नाव यादीत समाविष्ट करणे तसेच अपात्र नावे वगळण्याच्या दृष्टीने कारवाई करणे गरजेचे असते; यासाठी शासनाने दहा दिवसांचा वेळ वाढवून दिला असला तरीही ३१ जुलै पर्यंतच परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील मतदार पुनरीक्षण पूर्ण करून घेण्यात यावे, अशा सूचना माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील बूथ लेव्हल एजंटांच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.          आ. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली परळी वैद्यनाथ मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ लेव्हल एजंट (BLA) यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. परळी वैद्यना...

परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल....

इमेज
शासकीय कामकाजात अडथळा: परळीत एसआयआर चे काम करणाऱ्या बीएलओ ला मारहाण परळी वैजनाथ | प्रतिनिधी.....     परळी वैजनाथ शहरातील पेठ मोहल्ला परिसरात सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै 2026 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादी महेफूज जाकीर शेख (वय 42, व्यवसाय- शिक्षक, रा. मलिकपूरा, परळी वैजनाथ) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, 17 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता पेठ मोहल्ला परिसरातील अब्दुल हमीद शादीखाना येथे फिर्यादी हे एस आय आर मोहिमेचे शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपींनी संगनमत करून त्यांच्या हातातील शासकीय कामकाजाची कागदपत्रे हिसकावून घेतली. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.       या प्रकरणी शेख शाकेर अहमद, शेख जुनेद, शेख शोएब (सर्व रा. पेठ मोहल्ला, परळी वैजनाथ) तसेच आणखी अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता...