Motivational video: पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रेरक कार्यशैली
'देश हाच परिवार'... पंतप्रधान मोदींच्या देशाला समर्पित कार्यशैलीचा जवळून घेतलेला अनुभव पंकजा मुंडेंचा भावनिक व्हिडिओ चर्चेत परळी वैजनाथ, प्रतिनिधी : नेतृत्व म्हणजे केवळ निर्णय घेणे नव्हे, तर स्वतःला एका मोठ्या ध्येयासाठी पूर्णपणे वाहून घेणे," अशी भावना व्यक्त करत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती विषयीचा एक अनुभव मांडला आहे. दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रत्यक्ष आलेला हा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे शेअर केला असून, त्यात मोदी यांची कामावरील निष्ठा, राष्ट्रप्रथमचा दृष्टिकोन आणि अविरत कार्यक्षमतेचा उल्लेख केला आहे. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी त्या दोन-तीन दिवस दिल्लीत होत्या. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा अधिकृत दौरा पूर्ण करून थेट बैठकीला दाखल झाले. प्रवासाचा थकवा बाजूला सारत त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला. स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बाबी आणि विकासाशी संबंधित ...