पोस्ट्स

ऑगस्ट २, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संजय क्षीरसागर यांनी केला सत्कार...

इमेज
  डॉ. अरविंद गायकवाड यांची पदोन्नती; ‘प्रिव्हेंटिव्ह अन्कॉलॉजी’ पदावर नियुक्ती छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. अरविंद गायकवाड यांची ‘प्रिव्हेंटिव्ह अन्कॉलॉजी’ या महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक मराठवाडा साथीचे विशेष प्रतिनिधी संजय क्षिरसागर यांनी डॉ. अरविंद गायकवाड यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे प्रतिबंध, जनजागृती तसेच आजाराचे वेळीच निदान यामध्ये ‘प्रिव्हेंटिव्ह अन्कॉलॉजी’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या क्षेत्रात डॉ. गायकवाड यांची झालेली पदोन्नती ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.डॉ. अरविंद गायकवाड यांच्या या पदोन्नतीबद्दल वैद्यकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

"मोर्चा खंबीर... विषय गंभीर... मी येतोय परिवारासोबत... तुम्ही या परिवारासाठी!"

इमेज
  हा केवळ मोर्चा नाही, तर समाजाच्या अस्तित्वाचा आणि भावी पिढ्यांच्या हक्कांचा लढा; प्रत्येक कुटुंबाने सहभागी व्हावे उपवर्गीकरणा विरोधातील ऐतिहासिक लढ्यासाठी युवक नेते सचिन कागदे यांचे आवाहन परळी / प्रतिनिधी उपवर्गीकरणाच्या विरोधात सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर युवक नेते सचिन कागदे यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून संपूर्ण समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपवर्गीकरणाच्या विरोधात परळी शहरात सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी शहरात जोरदार जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.उपवर्गीकरण विरोधी मोर्चा परळी शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन मोर्चामागील भूमिका समजावून सांगत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन  करण्यात येत आहे.हे जनजागृती अभियान परळी शहरातील प्रत्येक नगर व परिसरात राबविण...

सर्व स्तरातून अभिनंदन... पंकजाताईंची पाठीवर कौतुकाची थाप

इमेज
युपीएससी मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश; ना. पंकजा मुंडे यांनी केले गाढे पिंपळगावच्या चैतन्य राडकरचे अभिनंदन परळी वैजनाथ दि. ०८ -- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन करणाऱ्या गाढे पिंपळगाव येथील  चैतन्य सुभाष राडकर याचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.    चैतन्यचे वडील सुभाष रiडकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून ना. पंकजा मुंडे यांनी चैतन्य ला मनापासून शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात एक ट्विटही त्यांनी केले आहे. माझ्या मतदारसंघातील  गाढे पिंपळगाव ता. परळी वैजनाथ जि. बीड येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी चैतन्य सुभाष राडकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याची असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. चैतन्य..तुझे मनःपूर्वक अभिनंदन..! अशा शब्दांत ना. पंकजाताईंनी अभिनंदन केले आहे. ••••
इमेज
मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, महासचिव संदीप लाहोटी यांचा  परळीत होणार सत्कार व्यापारी, नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे- सुरेश टाक, गोपाळ कंकाळ, जगदीश लड्डा, नितीन अग्रवाल, जयप्रकाश लड्डा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, महासचिव संदीप लाहोटी आणि नूतन पदाधिकारी यांचा उद्या रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी परळीत भव्य सत्कार होणार आहे. व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यास व्यापारी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुवर्णकार समाजाचे जेष्ठ नेते सुरेश टाक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ कंकाळ, किराणा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश लड्डा व नितीन अग्रवाल, डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे उपाध्यक्ष जयप्रकाश लड्डा यांनी केले आहे.        रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्रद्धा मंगल कार्यालय येथे नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, माजी नगराध्यक्ष...
इमेज
इनरव्हील क्लबतर्फे स्तनपानाचे महत्त्व पटवून देत बाळांना ड्रेस, मातांना फळवाटप परळी  : आईचे दूध हे बाळासाठी अमृतासमान असून त्यामध्ये पोषक घटक आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून विविध आजारांपासून त्याचे संरक्षण होते. तसेच आई आणि बाळातील भावनिक नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते, असे प्रतिपादन इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा आशा धुमाळ यांनी केले. इनरव्हील क्लब परळी वैजनाथच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात स्तनपानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी नवजात बाळांना ड्रेसचे वाटप करण्यात आले, तसेच मातांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास क्लबच्या अध्यक्षा आशा धुमाळ, सचिव शैलजा बाहेती, उपाध्यक्षा उमा समशेट्टी, एडिटर अनिता धुमाळ यांच्यासह श्रद्धा हालगे, दुर्गा राठोड, सुनीता वाघमोडे, शोभना सौंदळे, विजया दहिवाळ, छाया देशमुख आदींची उपस्थिती होती.

"चैतन्यमयी यश" :अभिनंदनाचा वर्षाव

इमेज
परळी वैजनाथ: गाढे पिंपळगावच्या शेतकरीपुत्राची ‘गरुडझेप’; चैतन्य राडकर याचे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत यश परळी वैजनाथ, दि. ८ : एमबी न्यूज  वृत्तसेवा....         ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील शेतकरी कुटुंबातील चैतन्य सुभाष राडकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याची असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली आहे. चैतन्यच्या या यशामुळे गाढे पिंपळगावसह परळी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात त्याचे कौतुक होत आहे. चैतन्यचे प्राथमिक शिक्षण गाढे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर परभणी येथील सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर गांधी विद्यालयातून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अकरावी-बारावीचे शिक्षणही त्याने परभणीतच पूर्ण केले. पारंपरिक शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत चैतन्यने IIT मद्रासच्या ऑनलाइन बीएस्सी डेटा सायन्स अभ्यासक्रमालाही सुरुवात केली. या अभ्यासक्रमासोबतच त्याने स्पर्धा प...

आनंदराज आंबेडकर , बबनराव घोलप यांच्यासह अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती

इमेज
  उपवर्गीकरणाच्या विरोधात परळीत 10 ऑगस्ट रोजी महामोर्चा  आनंदराज आंबेडकर , बबनराव घोलप यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती  परळी/ प्रतिनिधी      महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात राज्यात अनुसूचित जाती मध्ये फुट पाडण्याचे षडयंत्र राज्य सरकार करीत आहे.अनुसुचित जातीतील 59 जातींना दिलेल्या या आरक्षणाला व ऐक्याला तडा जाऊ नये यासाठी एस्सीतील सर्वच जातींचा  महामोर्चा दिनांक 10 ऑगस्ट  रोजी परळीत आयोजित करण्यात आला आहे.या मोर्चास रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने  आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.      10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चास सुरवात होईल. रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या महामोर्चात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्...

परळीत प्रथमच पोलीस महासंचालक पदावरील अधिकाऱ्याचे आगमन....!!!

इमेज
  नागरिकांची सुरक्षा, विश्वास आणि सेवा यासाठीच पोलीस २४ तास कार्यरत - पोलीस महासंचालक सदानंद दाते परळीला पोलीस उपाधीक्षक पद, आवश्यक मनुष्यबळ व संभाजीनगर ठाण्याला इमारत आदी महत्वपूर्ण मुद्द्यावर सकारात्मक परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      नागरिक हाच केंद्रबिंदू असून, जनतेला सुरक्षित, विश्वासार्ह आणि तत्पर सेवा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल कटिबद्ध आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांचा विश्वास संपादन करणे हेच आमचे सर्वोच्च ध्येय आहे असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केले.त्याचबरोबर परळीला पोलीस उपाधीक्षक पद, आवश्यक मनुष्यबळ व संभाजीनगर ठाण्याला इमारत आदी महत्वपूर्ण मुद्द्यावर सकारात्मक पोलीस महासंचालकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.        महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते दोन दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज (दि.७)परळी वैजनाथ पोलीस ठाण्याला भेट देऊन आढावा घेतला. त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. आज सकाळी बीड ये...
इमेज
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते बीड जिल्हा दौऱ्यावर; उद्या परळी वैजनाथ येथे देणार भेट परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे दि.६ व ७ ऑगस्ट दोन दिवस बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पोलीस दलाचा प्रशासकीय आढावा, विविध बैठका व जिल्ह्य़ातील काही पोलीस ठाण्यांनाही भेटी देणार आहेत. पोलीस महासंचालक स्वतः दोन दिवसांच्या दौऱ्यावर असल्याने हा अतिशय महत्त्वपूर्ण दौरा समजला जात आहे.        पोलीस महासंचालक सदानंद दाते हे दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर  आहेत. या दौऱ्यात जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था,  गुन्हेगारी आणि पोलीस दलातील प्रशासकीय आढावा ते घेणार आहेत.स्वतः पोलीस महासंचालक बीड दौऱ्यावर येत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. पोलीस महासंचालक हे परळी वैजनाथ येथेही भेट देणार आहेत. या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात तयारी सुरु असुन पोलीस ठाण्याचा परिसर चकाचक करण्यात आला आहे.तसेच रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यातील परळी व अंभोरा या दोन पोलीस ठाण्यांना भेटी देणार अ...

मृत्यू दावा १५ दिवसाच्या आत....

इमेज
ना.पंकजा मुंडे बनल्या पशुधनाच्या पालक ; राज्यात पशुधन विमा योजना लागू शेतकऱ्यांना मिळणार ८५ टक्के प्रीमियम अनुदान ; अपघात, नैसर्गिक आपत्ती व रोगामुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण  प्रत्येक कुटुंबातील १० पशुधन घटकांस मिळणार लाभ  मुंबई, ता. ६ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना  पंकजाताई मुंडे हया पशुधनाच्या पालक बनल्या असून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात पशुधन विमा योजना राबविण्यास सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या योजनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांना अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण मिळणार आहे.    यासंदर्भात अधिक माहिती देताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, हवामानातील अनपेक्षित बदल, नैसर्गिक आपत्ती, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाणी, अपघात तसेच लम्पी स्कीनसारख्या साथीच्या रोगांमुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक स्थैर्य टिकविणे, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळणे आणि कर्जबाजारी होण्यापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.  अ...

चुकीची माहिती व निराधार बातम्या असल्याचे स्पष्टीकरण....

इमेज
बीड जिल्हा कारागृहाबाबत प्रसारित वृत्त निराधार; कारागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण बीड (प्रतिनिधी):    बीड जिल्हा कारागृहासंदर्भात ४ आणि ५ ऑगस्ट रोजी विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करत कारागृह प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. कारागृहातील कैद्यांना नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याच्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रभारी अधीक्षक, बीड जिल्हा कारागृह वर्ग-२ यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, कारागृहातील कोणत्याही बंदीवानास अनधिकृत अथवा नियमबाह्य सुविधा दिल्या जात नाहीत. सर्व सुविधा कारागृह नियमावलीनुसारच उपलब्ध करून दिल्या जातात.बंदीवानांना आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी दहा मिनिटे दूरध्वनीवर बोलण्याची परवानगी आहे. मात्र, फोनद्वारे बाहेरील व्यक्तीने कॉन्फरन्स कॉल किंवा कॉल रेकॉर्डिंग केल्यास त्यावर कारागृह प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, याबाबत कारागृह मुख्यालयालाही कळविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच, बंदीवानांना नियमाप्रमाणे ...
इमेज
परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावणात दाखल होतात लाखो भाविक ; देवस्थान समितीकडून जय्यत तयारी सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी:       हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराची आराधना, उपासना आणि भक्तीचा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी परळी वैजनाथ येथे दाखल होतात. त्या अनुषंगाने वैद्यनाथ देवस्थान समितीकडून जय्यत तयारी सुरू आहे.       पौराणिक मान्यतेनुसार श्री वैद्यनाथ हे रोगहारी, दुःखनाशक आणि मनोकामना पूर्ण करणारे ज्योतिर्लिंग मानले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवार , विविध सणांचे दिवस आणि महिनाभरातील अन्य धार्मिक पर्वांनिमित्त येथे भक्तांची विशेष गर्दी होत असते. भगवान शंकराला जलाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि रुद्राभिषेक करण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने परळी वैजनाथची वाट धरतात. यंदाही ...
इमेज
विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप; शानूरभाई शेख यांच्या उपक्रमाचे कौतुक पुणे : प्रभाग क्र. १७, रामटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलमध्ये सामाजिक कार्यकर्ते शानू शेख यांच्या वतीने माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य, वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात माजी उपमहापौर निलेश मगर आणि नगरसेविका हेमलता मगर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शानूर शेख यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हाती घेतलेला हा शैक्षणिक उपक्रम प्रेरणादायी असून समाजातील इतरांनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, असे मत व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास अॅड. नासरजन हक्कानी, वसीम शेख, हाफिज फयाज मौलाना, प्राचार्या निखत , समीर शेख, उज्वला जाधव, अल्ताफ तांबोळी, नबी पटेल, मतिन शेख, मोहसीन सय्यद, सलमान शेख, शारिक खान, शादाब खान यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित...
इमेज
आळंदीत ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार वितरण सोहळा 12 ऑगस्टला; ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली गोरे यांचा होणार सन्मान आळंदी देवाची | प्रतिनिधी गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था, घुंडरे गल्ली, आळंदी देवाची येथे मंगळवार, दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी आध्यात्मिक वातावरणात ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार वितरण सोहळा आणि कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील संत, महंत, कीर्तनकार, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून, यंदाचा आध्यात्मिक आघाडीचा ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली गोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत ह.भ.प. बालासाहेब मोहिते पाटील यांची कीर्तन सेवा होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. वारकरी परंपरेचा गौरव वाढविणाऱ्या आणि ज्ञानेश्वरीच्या अध्ययन-प्रसारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुरस्काराचे वितरण ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदीचे विश्वस्त...

पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे आश्वासन

इमेज
श्रद्धानंद गुरुकुल आश्रमास सर्वतोपरी सहकार्य करणार !    पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे आश्वासन    परळी वैजनाथ, दि.५-      आदर्श नागरिक घडण्यासाठी व मानवाच्या  सर्वांगीण विकासाकरिता गुरुकुल ही शिक्षण प्रणाली ही अत्यंत पूरक असून याच्या माध्यमाने संस्कारक्षम पिढी घडते. या अनुषंगाने श्रद्धानंद गुरुकुल आश्रम संस्था मोलाचे कार्य करीत असून या परोपकारी संस्थेला भरीव निधी देऊन सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले.         येथील आर्य समाजाच्या वतीने नंदागौळ मार्गावर चालवल्या जाणाऱ्या श्रद्धानंद गुरुकुल आश्रमास ना. पंकजाताई नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते. तर  व्यासपीठावर स्वामी सोमानंद,  स्वामी विद्यानंद, डॉ. ब्रह्ममुनिजी(काळे सर), आर्यमुनिजी, आचार्य सत्येंद्रजी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी गुरुकुलात चालवल्या जाणाऱ्या सर्व उ...
इमेज
केजला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास कॅबिनेटची मंजूरी ; ना. पंकजा मुंडे यांनी मानले मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई दि. ०४ --- केज जि. बीड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्यास राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली, या निर्णयाबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.    केज (जि. बीड) येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व्हावे अशी येथील जनतेची खूप दिवसांपासूनची मागणी होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत ही मागणी मंजूर करण्यात आली, त्यामुळे केजला लवकरच न्यायालय सुरू होईल.  या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांची पदे व त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस देखील विधी व न्याय विभागाने मान्यता दिली आहे, या निर्णयाबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा वहिनी पवार यांचे आभार मानले आहेत. ••••

पोलीस निरीक्षक शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई..

इमेज
परळी ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील अट्टल फरार आरोपी जेरबंद परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी ग्रामीण पोलिसांनी दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार व अट्टल आरोपीला जेरबंद करत आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.         पोलीस निरीक्षक मल्हार. शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश निमोणे, पोलीस हवालदार पवार (ब.क्र. 913) आणि पोलीस अंमलदार धनवडे (ब.क्र. 1784) यांच्या पथकाने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक 439/2025, भारतीय न्याय संहिता कलम 309(4) अंतर्गत फरार असलेल्या आरोपीला अटक केली. अलाउद्दीन उर्फ सल्ल्या गफार सय्यद (वय 30), रा. काळरात्री मंदिर परिसर, भीमनगर, परळी वैजनाथ हा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा सातत्याने शोध सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध...

पद्मश्री डाॅ. डी. वाय. पाटील यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार...

इमेज
ना. पंकजा मुंडे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; उद्याचे सर्व कार्यक्रम, बैठका स्थगित शिक्षण महर्षी तथा पद्मश्री डाॅ. डी. वाय. पाटील यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे उद्या बुधवारी (ता. ५ ऑगस्ट) कोल्हापूर दौऱ्यावर जात आहेत.      उद्या सकाळी त्या मुंबईहून कोल्हापूरला रवाना होणार आहेत. डाॅ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे ना. पंकजाताई मुंडे यांनी उद्याचा जनता दरबार, बैठका व अन्य कार्यक्रम रद्द केले आहेत, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांनी उद्या मुंबईत येऊ नये आणि होणारी गैरसोय टाळावी असे आवाहन त्यांच्या संपर्क कार्यालयाने केले आहे. ••••

शिक्षण क्षेत्रात पोकळी ; कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य हरवल्याची व्यक्त केली भावना

इमेज
पद्मश्री डाॅ. डी. वाय. पाटील यांचे निधन ; ना. पंकजाताई मुंडे यांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली शिक्षण क्षेत्रात पोकळी ; कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य हरवल्याची व्यक्त केली भावना मुंबई दि. ०४ --- शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबातील जेष्ठ सदस्य हरवला असल्याची भावना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.      डॉ. डी.वाय. पाटील हे आमच्यासाठी कुटुंबातील जेष्ठ मार्गदर्शक होते. मुंडे साहेबांशी त्यांचा विशेष स्नेह होता. शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्था हे आदर्शवत आहे. शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने  त्यांना 'पद्मश्री' या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या ...

महत्त्वपूर्ण बातमी....

इमेज
  महाराष्ट्रासाठी एसआयआर वेळापत्रकात सुधारणा भारतीय निवडणूक आयोगाने  महाराष्ट्रातील विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) अंमलबजावणीच्या सध्याच्या मुदतीत  मुदतवाढ जाहीर केली आहे.  महाराष्ट्र राज्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमामध्ये खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रक मंजूर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक १.बीएलओमार्फत घराघर भेटी - ३०.०६.२०२६ ते १७.०८.२०२६ २.मतदान केंद्रांचे पुनर्रचनेकरण / पुनर्व्यवस्थापन- १७.०८.२०२६ प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन- २४.०८.२०२६ ४.दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी- २४.०८.२०२६ ते २३.०९.२०२६ ५.दावे व हरकतींची नोटीस प्रक्रिया / निकाली काढणे-२४.०८.२०२६ ते २२.१०.२०२६ ६.अंतिम मतदार यादीचे प्रकाशन-२७.१०.२०२६
इमेज
१० ऑगस्टच्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परळीत एलईडी जनजागृती व्हॅनचे उद्घाटन परळी/ प्रतिनिधी... अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) विरोधात १० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचे उद्घाटन आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात करण्यात आले. या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधातील भूमिका, मोर्चाचे उद्दिष्ट तसेच समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. शहरासह ग्रामीण भागात ही व्हॅन फिरून जनजागृती करणार असल्याची माहिती मिळते आहे. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. १० ऑगस्ट रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक आणि व्यापक स्वरूपाचा करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

नगरसेविका अश्विनी केंद्रे व युवा नेते राहुल केंद्रे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार ...

इमेज
ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिरासतील पात्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगरला रवाना नगरसेविका अश्विनी केंद्रे व युवा नेते राहुल केंद्रे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-       महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा लोकनेत्या ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ. अश्विनी राहुल केंद्रे व युवा नेते राहुल रामचरण केंद्रे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना आज अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी नेत्रालयात शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.         आनंदऋषीजी नेत्रालय, अहिल्यानगर आणि अरिहंत जैन सेवाभावी संस्था, परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर, पद्मावती गल्ली येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आधुनिक संगणकीय...
इमेज
कोल्हापूरच्या भव्य तैलिक समाज मेळाव्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; संगमेश्वर फुटके   प्रदेश उपाध्यक्ष संजय बापू विभुते यांचा बीड जिल्ह्याच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत परळी वैजनाथ : प्रतिनिधी...     कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य तैलिक समाज मेळावा होणार आहे, या मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर आप्पा फुटके यांनी केले आहे.  कोल्हापूर येथे २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तैलिक समाजाचा भव्य मेळावा होणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना सांगली जिल्हाध्यक्ष (शिंदे गट) सन्माननीय संजय बापू विभुते परळी वैजनाथ येथे आले होते. बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर आप्पा फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा सचिव प्रा. मधुकर शिंदे यांनी संजय बापू विभुते यांचे स्वागत केले. तर परळी तेली युवक संघटनेचे अध्यक्ष पवनजी फुटके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना संज...
इमेज
कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात नशा मूक्तची शपथ परळी वैजनाथ,प्रतिनिधी...दि.३)ःयेथील लक्ष्मीबाई देशमुख महिला  महाविद्यालयामध्ये राष्टीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत यूवा कनेक्ट २.0 अंतर्गत नशा मुक्त भारत या साठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांना एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विवेकानंद कवडे यांनी शपथ दिली.  विकसित भारत यूवा कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण  करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या  स्वयंसेवकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संस्थेचे कोश्याध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख,  महाविद्यालयाच्या  प्राचार्या  डॉ विद्या देशपांडे,  प्रा. डॉ. देशपांडे , प्रा डॉ गुट्टे , प्रा. डॉ.  चव्हाण , प्रा. डॉ. दिग्रसकर , प्रा. डॉ. कुलकर्णी , राष्ट्रीय सेवा  योजना विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद कवडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,   प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
  ग्रामीण पोलीसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान चोरी पकडली; ; एकाला अटक करत मुद्देमाल जप्त  परळी वैजनाथ : प्रतिनिधी...      परळी ग्रामीण पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान चोरीच्या लोखंडी गजांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सुमारे २७ हजार किमतीचे १५ लोखंडी गज जप्त केले. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याचा एक साथीदार फरार झाला आहे.        पोलीस उपनिरीक्षक अंकुश निमोणे, पोलीस हवालदार उबाळे, पोलीस अंमलदार घोडके, पोलीस चालक वाघमारे हे गस्तीवर असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गस्त पथकाने सापळा रचून टाटा कंपनीचे वाहन (क्र. एमएच ४४/यू ०८८६) अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून २५ मिमी जाडीचे, २० फूट लांबीचे एकूण १५ लोखंडी गज (एकूण वजन सुमारे ४५० किलो) चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी  एकाला  वाहनासह ताब्यात घेण्यात आले....

गॅस एजन्सीच्या बाबतीत परळीकरांच्या वाढत्या तक्रारी...

इमेज
ऑनलाईन पैसे भरूनही घरपोच गॅस न दिल्याची तक्रार; गॅस वितरकावर कारवाईची मागणी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ गॅस डिस्ट्रीब्युटर (नाथ रोड) यांच्याकडून ऑनलाईन पैसे भरूनही घरपोच गॅस सिलिंडर न दिल्याचा आरोप करत ग्राहकाने तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित गॅस वितरकावर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. परळी वैजनाथ येथील रहिवासी तथा एचपी गॅसचे ग्राहक सचिन भांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी १४ जुलै २०२६ रोजी गॅस सिलिंडरचे ऑनलाईन बुकिंग करून संपूर्ण रक्कम भरली होती. कंपनीच्या नियमानुसार या रकमेत घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा शुल्काचाही समावेश असतानाही, संबंधित गॅस एजन्सीकडून सिलिंडर घरपोच देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ग्राहकाकडून पूर्ण पैसे स्वीकारूनही सेवा न देणे हे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील 'सेवेतील त्रुटी (Deficiency in Service)' तसेच 'अनुचित व्यापारी प्रथा (Unfair Trade Practice)' या प्रकारात मोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अत्यावश्यक ...

सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव!!!

इमेज
संपादक बालासाहेब फड यांना ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार 2026’ जाहीर परळी(प्रतिनिधी )      दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक  बालासाहेब फड यांना पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडत त्यांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लेखणी चालविल्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे.बालासाहेब फड यांनी आपल्या निर्भीड, निःपक्ष आणि जनहितवादी पत्रकारितेतून अनेक गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला तसेच सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली. प्रशासनापर्यंत जनतेच्या समस्या पोहोचवून अनेक प्रकरणांमध्ये सकारात्मक कार्यवाही घडवून आणण्यात त्यांच्या लेखणीचे मोठे योगदान राहिले आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताची विविध कामे त्यांनी सातत्याने केली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला असून, या सन्मानामुळे पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे ...

ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.....

इमेज
  भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप  ; चित्रकला स्पर्धेत दीड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण परळी वैजनाथ,प्रतिनिधी..... महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण, धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय उपक्रमांसह विविध गरजू नागरिकांना मदतीचे कार्यक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक गटातील चित्रकला स्पर्धेत विद्यावर्धिनी वि...