इमेज
  महेश नवमी निमित्त आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ६१ जणांची आरोग्य तपासणी; ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान परळी वैजनाथ | प्रतिनिधी       महेश नवमी २०२६ निमित्त स्व. कौसल्याबाई गोविंदलालजी नावंदर यांच्या स्मरणार्थ परळी माहेश्वरी महिला संघटना आणि परळी तालुका माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात ६१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ८० रक्तदात्यांनी  रक्तदान केले.      या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सीबीसी, एचबीए1, आणि लिक्विड प्रोफाईल यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. एकूण ६१ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला , तर ८० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले....

`विकास पर्व 2.0` चा आरंभ.....

 `विकास पर्व 2.0` चा आरंभ :परळीच्या थेट लोकनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई  बाजीराव धर्माधिकारी ३ जानेवारी रोजी घेणार पदभार

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस व  महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या परळी नगर परिषदेच्या थेट लोकनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी या नगराध्यक्ष पदाचा पदभार ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वा. घेणार आहेत. 

      परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवड झाली. यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणाऱ्या नगराध्यक्षा म्हणून परळीच्या नगराध्यक्षांनी बहुमान    मिळवला आहे. ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व महायुतीच्या उमेदवार म्हणून परळीतून थेट लोकनिर्वाचित नगराध्यक्षा झालेल्या सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी या आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार येत्या ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता घेणार आहेत. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी परळीच्या विकासाचा नवसंकल्प करत परळीच्या विकासाची पंचसूत्री परळीकरांना सादर केलेली आहे. परळीचा सर्वंकष व चौफेर विकास करण्याचे अभिवचन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून `विकास पर्व 2.0` हा नवा टप्पा यानिमित्ताने सुरू होणार आहे. नव्या वर्षात दि. 3 जानेवारी रोजी दुपारी १ वाजता  सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी या नगराध्यक्षा म्हणून आपली जबाबदारी सांभाळणार आहेत. नियमानुसार दिनांक २३.१२.२०२५ पासुन २५ दिवसाच्या आत पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करणे, उपाध्यक्ष निवडीबाबत आणि नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने बाकी सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या